विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध अभिनेता आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला. हा आमीर खान आणि किरण राव यांच्या खासगी जीवनातील प्रश्न आहे. त्यांच्या निर्णयाचा सन्मान करायला हवा, अशा प्रतिक्रिया चित्रपटसृष्टीतील तारे-तारकांनी व्यक्त केल्या आहेत. आम्ही दोघेही चांगले मित्र राहणार असून, याकडे चांगली सुरुवात म्हणून पाहायला पाहिजे, असे आमीर आणि किरण राव यांनी आपल्या निवेदनात म्हटले होते. यादरम्यान, आमीर यांची मुलगी इरा खानने एक पोस्ट लिहली असून, ती चांगलीच व्हायरल झाली आहे.
इरा सिनेमाजगतापासून लांब असली तरी सेलिब्रिटीची मुलगी असल्याने नेहमीच चर्चेत राहते. सोशल मीडियावर तिची चांगलीच फॅन फॉलॉइंग आहे. इराने आमीर आणि किरण यांच्या घटस्फोटानंतर लिहिलेली पहिली पोस्ट चांगलीच चर्चेत आली. काही तासातच ती व्हायरल झाली.
फॅन्स विचारात
इराने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर लिहिले, “पुढील रिव्ह्यू उद्या! पुढे काय होणार आहे?” (अगला रिव्ह्यू कल! आगे क्या होने वाला है?) या पोस्टवरून फॅन्स चांगलेच बुचकळ्यात पडले आहेत. इराला नेमके काय म्हणायचे आहे, हे कोणालाच समजले नाही. उद्या ती कोणत्या गोष्टीवर बोलणार आहे, याचाच विचार फॅन्स करू लागले आहेत.
आमीर-किरण यांचा व्हिडिओ
आमीर आणि किरण यांचा एक व्हिडिओ समोर आला. त्यामध्ये त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. व्हिडिओत आमीर म्हणतो, “तुम्हा लोकांना दुःख झाले असेल, चांगले वाटले नसेल, धक्का बसला असेल. आम्हा दोघांना एवढेच सांगायचे आहे की, आम्ही दोघे खूप खूश आहोत, एक कुटुंब आहोत. आमच्या संबंधांमध्ये बदल झाला आहे. परंतु आम्ही दोघे एकमेकांसोबतच आहोत. तुम्ही असे कधीच समजू नका.”