मुंबई – आजच्या ताणतणावाच्या काळात कोणालाही नैराश्य येऊ शकते, मात्र याबद्दल फारसे कोणी सांगत किंवा बोलत नाही. परंतु मानसिक आजार हा देखील शारीरिक आजारांप्रमाणेच सर्वसामान्य असू शकतो. आणि त्यावर आपल्या घरच्यांना सांगणे वेळीच उपचार करणे गरजेचे आहे असे मानसिक आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. आमिर खानची मुलगी इरा खान सोशल मीडियावर खूप सक्रीय असून तिने तिच्या मानसिक आरोग्याबद्दल आणि नैराश्याबद्दल उघडपणे सांगितले. तिला सहसा राग येत नाही. पण अलीकडेच तिला खूप राग येतो. तेव्हा कसे व्यक्त व्हायचे हे समजत नाही. यासंदर्भात तिने आपल्या मानसोपचारतज्ज्ञांशीही चर्चा केली.
इरा हिने चाहत्यांना एका व्हिडीओद्वारे आरोग्याविषयी माहिती दिली आहे. काही व्यक्तींना त्यांच्या रागाचा सामना कसा करावा हे माहित नसते. इरा पुढे म्हणाली की, ती ड्रायव्हिंग करून घरी जात होती पण ती फार वेळ कार चालवू शकली नाही. कारण ती गाडी चालवत होती, जेव्हा तिला कळले की ती फार रागावलेली असून स्वतः गाडी चालवण्याच्या स्थितीत नाही. म्हणून मी कार रस्त्याच्या कडेला उभी केली आणि मग कोणीतरी नेण्यासाठी आले. तेव्हा मी खूप रडत राहिले.
इरा खान आपली उदासीनता उघड करताना म्हणाली की, मी जवळजवळ चार वर्षे नैराश्यात आहे. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. गेल्या वर्षभरापासून मला मानसिक आरोग्यावर काहीतरी करायचे होते. पण मला काय करावे याची खात्री नव्हती. आता मला बरे वाटत आहे.