मुंबई – प्रसिध्द अभिनेता आमिर खान याचे दुसरे लग्नही मोडले असून त्याने १५ वर्षाच्या किरण राव यांच्याबरोबरील संसारानंतर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दोघांनी अधिकृत निवेदन सुध्दा प्रसिध्द केले आहे. आमिर खान यांचे पहिले लग्न रिना दत्ताशी झाले होते. हा संसार १६ वर्ष चालला. त्यानंतर त्यांनी दोघांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर आमिरने दुसरे लग्न केले. पण, हे लग्नही आता १५ वर्षानंतर मोडले आहे.
आमिर व किरण राव यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय संमतीने घेतला असला तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असे या दोघांनी म्हटले आहे. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशनसह इतर अनेक प्रोजेक्टवर एकत्रित काम केले आहे. ते सुध्दा ते पुढे सुरुच ठेवणार आहे.
या दोघांनी प्रसिध्द केलेल्या संयुक्त निवेदन पुढे म्हटले आहे की, १५ वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण आले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असे आम्हाला वाटतं असे म्हटले आहे.
दोन लग्न, पण आता एकटा
आमिर खानाचे पहिले लग्न हे कयामत से कयामत तक सिनेमाचे शूटिंग सुरु असतांना रिना दत्ताशी झाले होते. पण, त्याने २००२ मध्ये पहिला घटस्फोट घेतला. या पहिल्या लग्नापासून झालेले जुनैद आणि आयरा ही दोन्ही मुले आई रिनासोबतच राहतात. तर दुसरे लग्न किरण राव बरोबर केले. या लग्नापासून त्यांना आझाद हा १० वर्षाचा असून तो आई किरण बरोबर राहणार आहे. २०११ मध्ये सरोगेसीव्दारे आझादचा जन्म झाला होता. किरण राव बरोबर आमिर खान यांची भेट लगान सिनेमाच्या सेटवर झाली होती. तेव्हा ती सहाय्यक दिग्दर्शक होती. यावेळी त्यांनी एकमेकांना दोन वर्ष टेड केल्यानंतर त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता.