इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजकीय व्यक्ती किती चांगले काम करत असले तरी त्यांना काही वेळा त्यांच्या नातेवाईकांमुळे अडचणीचा सामना करावा लागतो. विशेषतः काही राजकीय नेत्यांची मुले ही नालायक असतात, असे आढळून आले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांमध्ये असे प्रकार घडलेले आढळतात. सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे देखील आपल्या मुलाच्या गैरकृत्यामुळे अडचणीत आले आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर याच्या अशाच काही गैरकृती समोर आल्या आहेत, ज्यामुळे ते मोठ्या अडचणीत येऊ शकतात. हंटरची छायाचित्रे आणि व्हिडिओ अनेक वेबसाइटवर फिरत आहेत. हंटर याच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून ही सर्व छायाचित्रे आणि माहिती समोर आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे सीक्रेट सर्व्हिसनेही याला दुजोरा दिला. त्यानुसार हंटर याच्या आय क्लाऊड अंकाउंट मधून काही अश्लिल साहित्य बाहेर आले आहे, त्यावर लक्ष ठेवले जात आहे. त्याचवेळी जो बायडेन यांना भाषण करताना एका निदर्शकाने याबाबत प्रश्न विचारल्याने त्यांना या बिकट परिस्थितीला सामोरे जावे लागले.
एका आंदोलकाने विचारले की, त्यांना आपल्या मुलाचे लीक झालेले फोटो आणि व्हिडिओ बद्दल माहित आहेत का ? यावर राष्ट्रपती त्या आंदोलकाला गप्प बसायला सांगतात. विशेष म्हणजे जो बायडेन यांच्या मुलाने सेक्स वर्कर्सवर लाखो रुपये खर्च केल्याचा आरोप आहे.
तसेच काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, त्याने पाच महिन्यांत सुमारे 24 लाख रुपये उडवले गेले. हा खर्च नोव्हेंबर 2018 ते मार्च 2019 दरम्यान करण्यात आला आहे. परंतु त्यावेळी बायडेन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष नव्हते.
तसेच काही हॅकर्सनी दावा केला होता की, त्यांनी ज्युनियर बायडेनचा फोन हॅक केला होता आणि त्यांना त्यातून आक्षेपार्ह अश्लिल फोटो मिळाले होते. लॅपटॉप आणि फोनमधून डेटा लीक झाला हा सर्व डेटा हंटर याच्या लॅपटॉपमधून सापडला होता, तो त्यांनी दुरुस्तीसाठी दिला होता. तेथे त्याच्या लॅपटॉपमधून डेटा चोरीला गेल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. सुरक्षा यंत्रणा आता या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. मात्र, हे प्रकरण अद्याप निरीक्षणाधीन असल्याने याबाबत कोणतेही वक्तव्य देण्यास त्यांनी नकार दिला. तसेच काही काळापूर्वी हंटर बिडेनचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये तो बाथटबमध्ये बसून ड्रग्ज घेत होता.
American President Joe Biden Son Laptop Photos Leaked