इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कोणतेही व्यसन हे वाईटच असते, सहाजिकच अनेक देशात सिगारेट आणि दारू सार्वजनिक ठिकाणी पिण्यावर बंदी आहे. ऑस्ट्रेलियामध्ये या संदर्भात कडक निर्बंध आहेत. परंतु अमेरिकेत मात्र एका अमेरिकन कंपनीने दुसऱ्या देशात सिगारेट निर्यात केल्याबद्दल जबर दंड केला आहे. या दंडाची रक्कम ऐकून कोणीही आश्चर्यचकित होईल. विशेष म्हणजे या उलट या कंपनीला दुसऱ्या एका देशातील हुकूमशहाने बक्षीस जाहीर केले आहे.
उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील शत्रुत्व सर्वांना माहीत आहे. दोन्ही देशांतील एखाद्या कंपनीने एकमेकांसोबत व्यवसाय केला तरी त्याचा फटका त्यांना सहन करावा लागतो. अमेरिकेच्या एका कंपनीने उत्तर कोरियाला सिगारेट विकल्याच्या कारणावरून अमेरिक सरकारने ५२ हजार कोटी रुपयांचा दंड केला आहे. जगातील सर्वात मोठी तंबाखू कंपनी असलेल्या ब्रिटिश अमेरिकन टोबॅको कंपनीला हा दंड ठोठावला आहे. बॅट’ ही जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी सिगारेट कंपनी असून इराण, क्यूबासारख्या अनेक प्रतिबंधित देशांशी या कंपनीचा अजूनही व्यापार आणि व्यवहार सुरू आहे.
आणखी विशेष गोष्ट म्हणजे या विक्रीत सहभागी उत्तर कोरियाचे बँकर सिम ह्योन-सॉप, चीनी सहाय्यक किन गुओमिंग आणि हान लिनलिन यांच्यावर देखील गुन्हेगारी आरोप लावण्यात आले आहेत. मात्र, तिन्ही आरोपी फरार आहेत. कारण त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आल्या त्यांना आधीच कुणकुण लागल्याने हे तिन्ही आरोपी अगोदरच पसार झाले आहेत. मात्र त्यांना अटक करण्यासाठी अमेरिकेने कंबर कसली आहे
विशेष म्हणजे बँकर सिमचा ठावठिकाणा शोधून देणाऱ्यास अमेरिकेने ४० कोटी रुपयांचे इनाम तथा बक्षिस जाहीर केले आहे, तर इतर दोघांसाठी प्रत्येकी चार-चार कोटींचे इनाम जाहीर केले आहे. कारण उत्तर कोरियाला सिगारेट्स विकण्यासाठी बनावट कागदपत्रं बनवून देण्यात, या तिघांचा मोठा वाटा होता. या माध्यमातून अमेरिकी बँकांमधून ६०० कोटी रुपये ट्रान्सफर करण्यात आले. उत्तर कोरियाच्या कंपन्यांना तर या हेराफेरीतून सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा फायदा झाला.
उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांना त्या सिगारेट ओढण्याचा शौक आहे. चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्यासोबत शिखर परिषदेसाठी व्हिएतनामला जात असताना किम जोंग ट्रेनमध्ये धूम्रपान करताना दिसला होता. त्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. किम जोंग उन याला खुश करण्यासाठी आणि त्यांच्याकडून जादा ‘बक्षिसी’ मिळवण्यासाठीही कंपनीने हे उद्योग केले गेल्याचे म्हटले जात आहे.
America Fine Company Korea Kim Jong Un Award