भारतीय अंतराळ संशोधन संशोधनात इस्रोने मोठी कामगिरी बजावली आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेत देखील नासाच्या वतीने अवकाश संशोधनात नेहमीच वेगवेगळे प्रयोग करण्यात येतात. इतकेच नव्हे तर आता खासगी अवकाश संशोधन संस्था देखील अंतराळात अंतराळवीर पाठवून वेगवेगळे प्रयोग करत आहेत. अंतराळात गेलेल्या अंतराळवीरांना संशोधनासाठी पृथ्वीवरून वेळोवेळी रॉकेटच्या साह्याने मदत पाठविण्यात येते. अशीच आगळीवेगळी मदत नुकतीच अमेरिकेत एका खासगी कंपनीतर्फे पाठविण्यात आली. या कंपनीच्या रॉकेटने सुमारे २ हजार किलो ताजी फळे आणि प्रयोगाच्या साहित्यासह यशस्वीपणे उड्डाण केले.
अमेरिकेतील स्पेसएक्स कंपनीने काल रविवारी मुंग्या, ताजी फळे आणि अन्य सामान घेऊन मानवी आकाराचे रोबोटिक हात असलेले रॉकेट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) लाँच केले. आज सोमवारी उशीरापर्यंत हा पुरवठा पोहोचलेला असेल, गेल्या दशकात स्पेसएक्सकडून नासाकडे २३ वेळा असे वितरण करण्यात आले आहे.
इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा इंटरनॅशनल स्पेस स्टेशन ( आयएसएस ) हे एक संशोधन सुविधा ठिकाण असून ते पृथ्वीच्या जवळ कक्षामध्ये स्थापित बाह्य अवकाशात आहे. या प्रकल्पाची सुरुवात १९९८ मध्ये झाली असून २०११ पर्यंत ते तयार झाले. आजपर्यंतचा हा मानवनिर्मित सर्वात मोठा उपग्रह असून आयएसएस कार्यक्रम हा अनेक जागतिक अंतराळ संस्थांचा संयुक्त उपक्रम आहे.
रशियाची रशियन फेडरल स्पेस एजन्सी , जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी, कॅनडाची कॅनेडियन स्पेस एजन्सी आणि युरोपीय देशांची युनायटेड युरोपियन स्पेस एजन्सी अमेरिकेत नासासोबत काम करत आहेत. या व्यतिरिक्त, ब्राझिलियन स्पेस एजन्सी काही करारांसह नासासोबत काम करत आहे. त्याचप्रमाणे, इटालियन स्पेस एजन्सी देखील थोड्या वेगळ्या करारासह कार्यरत आहे. दरम्यान, ताजी फळे आणि प्रयोगां सामानासह यशस्वीपणे स्पेसएक्सच्या रिसायकल फाल्कन रॉकेटने रविवारी सकाळी नासाच्या केनेडी स्पेस सेंटरमधून उड्डाण केले. आयएसएसवर असलेल्या सात अंतराळवीरांसाठी प्रयोगासाठी आइस्क्रीम, एवोकॅडो, लिंबू आणि मुंग्यांसह सुमारे २१७० किलोग्रॅम पुरवठा असलेले ड्रॅगन कॅप्सूल घेऊन पहिल्या टप्प्यातील बूस्टर रॉकेट स्पेसएक्सच्या महासागरात सोडण्यात आले असून नवीन बांधलेल्या प्लॅटफॉर्मवर यशस्वीरित्या उतरले.
……