इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
भारतावर तब्बल २५ टक्के टॅरिफ लादण्याची घोषणा अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. त्यात १ ऑगस्टपासून २५ टक्के व्यापार शुल्क आणि दंड द्यावा लागणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराची चर्चा अंतिम टप्यात पोहोचली नाही. अमेरिकेकडून भारतातील कृषी आणि डेअरी क्षेत्र खुलं करण्याची मागणी करण्यात येत होती.
भारत आमचा मित्र आहे. कित्येक वर्षापासून मैत्री असली तरी आमच्या भारतासोबत व्यापार कमी आहे. कारण त्यांचं ट्रॅरिप खूप अधिक आहे. जगातील सर्वाधिक टॅरिफ त्यांच्याकडे आहे. त्यांच्याकडे कोणत्याही देशापेक्षा सर्वात कठीण आणि घृणास्पद गैर – मौद्रिक व्यापार अडथळे आहेत. तसेच त्यांनी नेहमीच त्यांच्या लष्करी उपकरणांचा मोठा भाग रशियाकडून खेरदी केला आहे आणि चीनसह ते रशियाचे उर्जेचे सर्वात मोठे खरेदीदार आहेत. अशा वेळी जेव्हा प्रत्येकाला रशियाकडून युक्रेनमध्ये होणा-या हत्या थांबवाव्या असे वाटते. सर्व काही चांगले नाही. म्हणून भारताला १ ऑगस्टपासून २५ टक्के ट्रॅरिफ आणि वरील दंड देईल असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.