इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – कर्नाटकातील बिंदूरजवळील टोल गेटवर रस्ता अपघाताचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. वेगाने धावणारी रुग्णवाहिका टोलनाक्याला कशी जबरदस्त धडकली हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. काही क्षणातच रुग्णवाहिकेचा स्फोट झाला. यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये रुग्णवाहिकेतील एका रुग्णासह तीन जणांचा समावेश आहे, तर दुसरा मृत टोल कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण आणि दोन परिचरांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यातील बिंदूरजवळील टोल बूथला ही रुग्णवाहिका धडकली. रुग्णवाहिकेतील रुग्ण आणि एका टोल अटेंडंटसह तीन जणांचा मृत्यू झाला. चालक जखमी झाला आहे. या भीषण अपघाताची घटना टोलनाक्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पावसात रुग्णवाहिका घसरल्याने हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, रुग्णवाहिकेला डोलताना पाहून टोलवरील सुरक्षा रक्षक आणि टोल ऑपरेटर हे प्लास्टिक बॅरिकेड्स काढण्यासाठी धावताना दिसत आहेत. एक गार्ड टोल प्लाझासमोरील दोन बॅरिकेड्स यशस्वीपणे हटवताना दिसत आहे. पण शेवटचा बॅरिकेड काढताना त्यालाही अॅम्ब्युलन्सची धडक बसली आणि अपघातात त्याचा मृत्यू झाला.
बघा या अपघाताचा थरारक व्हिडिओ
https://twitter.com/MangaloreCity/status/1549757819444142081?s=20&t=raBv0nm4pMX_5nEaarO2yg
Ambulance Accident on Toll Naka Karnataka Thrilling Video