सोमवार, ऑगस्ट 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अंबरनाथ शहराच्या विकासासाठी ७७५ कोटींचा निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

by Gautam Sancheti
मार्च 18, 2023 | 4:48 pm
in राज्य
0
unnamed 4

 

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अंबरनाथ शहराची वाढ होत असून जागतिक पातळीवर त्याचे नाव होत आहे. या वाढत्या शहराच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सुमारे ७७५ कोटींचा निधी दिला आहे. या शहराकडे माझे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लक्ष असून येथील विकासासाठी सढळ हस्ते मदत करू, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

अंबरनाथ शिवमंदिर येथे डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशनतर्फे आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिव्हलला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार सर्वश्री ज्ञानेश्वर म्हात्रे, डॉ. बालाजी किणीकर, माजी आमदार रवींद्र फाटक, नरेंद्र पवार, गोपाळ लांडगे, सुनील चौधरी, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, अंबरनाथ नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत रसाळ आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी शिव मंदिरात जाऊन श्री महादेवाचे पूजन करून दर्शन घेतले. यावेळी प्राचीन शिवमंदिरवरच्या गाण्याचे सादरीकरण कलाकारांनी केले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून निर्मिती केलेल्या अंबरनाथच्या विकासावरील लघुपटाचे सादरीकरण झाले.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर परिसराला यापूर्वीही भेट दिली आहे. मात्र आता शिव मंदिर परिसर बदलत असून येथे विकास करण्यात येत आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर 138 कोटी रुपये शिवमंदिर परिसराच्या विकासासाठी दिले. त्याशिवाय या शहराचे आरोग्य चांगले राहावे यासाठी घनकचरा प्रकल्पासाठी १५० कोटी, रस्त्यांच्या कामासाठी २२२ कोटी, जिल्हा वार्षिक योजनेतून १०७ कोटी, दलित वस्तीमधून 32 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण मधून ७८ कोटी, इतर कामासाठी दिले ४८ कोटी निधी दिला आहे.

अंबरनाथ वाढतंय, या वाढत्या शहराच्या गरजाही मोठ्या आहेत. त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाची आहे. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यासाठी पाठपुरावा केला आणि निधी मिळविला. त्याचबरोबर या शहराची सांस्कृतिक गरज देखील भागवली पाहिजे म्हणून अशा प्रकारचा मोठा शिवमंदिर फेस्टिवल त्यांनी सुरू केला आणि म्हणून हजारो लोक या ठिकाणी त्याचा आनंद घेतायत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

हे राज्य सर्व सामान्य लोकांच्या मनातलं राज्य आहे. आपल्या अर्थसंकल्पमध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, मुली, विद्यार्थी अश्या सगळ्यांचा विचार केला आहे. त्याच बरोबर प्राचीन मंदिर व गडकिल्ल्यांचे संवर्धन जतन देखील करणार आहोत. आपल्या सगळ्यांच्या सदिच्छामुळे या राज्यामध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन केले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमरावती येथे मेगा टेक्सटाईल पार्क मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी यांचे आभार मानले.

खासदार डॉ. शिंदे म्हणाले की, अंबरनाथ शहराचा विकास करताना प्रशासनाने चांगली साथ दिली. शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने या शहराचा विकास होत आहे. ज्या सोयीसुविधा महानगरपालिका देते त्याच प्रकारच्या सोयी अंबरनाथ नगरपरिषदेच्या माध्यमातून देण्यात येत आहेत. यामध्ये मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मोठे सहकार्य आहे. या ठिकाणी प्रशासन आणि शासन एकत्र काम करत आहे. त्याचबरोबर सगळ्या लोकप्रतिनिधीचे मार्गदर्शन या अंबरनाथच्या विकासासाठी लाभत आहे. अंबरनाथ शहराच्या विकासासाठी सहकार्य केल्याबद्दल मुख्याधिकारी प्रशांत रसाळ यांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

Ambernath City Development 775 Crore Fund CM Eknath Shinde

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

गोपीनाथराव मुंडे असते तर मी अडीच वर्ष जेलमध्ये गेलो नसतो – छगन भुजबळ

Next Post

नितीन गडकरींकडे आहे हा अनोखा ट्रॅक्टर… वर्षाकाठी होते इतक्या लाखांची बचत… त्यांनी स्वतःच सांगितलं…

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
FrfHwmTWYAAyy5C

नितीन गडकरींकडे आहे हा अनोखा ट्रॅक्टर... वर्षाकाठी होते इतक्या लाखांची बचत... त्यांनी स्वतःच सांगितलं...

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींचे आर्थिक नियोजन काही प्रमाणात ढासळेल, जाणून घ्या, सोमवार, ११ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 10, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

बिबट्याच्या हल्ल्यात मृतकच्या वारसांना १० लाखांचा धनादेश सुपूर्द…

ऑगस्ट 10, 2025
IMG 20250808 WA0367 2 e1754829983694

एसएनडी अभियांत्रिकी महाविद्यालयाला युजीसीकडून स्वायत्त दर्जा…नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय

ऑगस्ट 10, 2025
प्रातिनिधिक फोटो

आता अहिल्यानगर-पुणे नव्या रेल्वे मार्गासाठी प्रयत्न…शंभर ते सव्वाशे किलोमीटर अतंर कमी होणार

ऑगस्ट 10, 2025
modi 111

नवी दिल्लीत संसद सदस्यांसाठी नव्याने बांधण्यात आलेल्या १८४ सदनिकांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन…

ऑगस्ट 10, 2025
नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांचे फोटो 1 1024x683 1 e1754819420411

नागपूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ….या स्थानकावर थांबे

ऑगस्ट 10, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011