नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत कायमच स्थान पटकाविणारे उद्योजक मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेला धोका असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. या कारणास्तव त्यांना देशात तसेच विदेशातही झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे.
अंबानी यांना देण्यात आलेल्या सुरक्षेविरुद्ध मागील वर्षी एका याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका निकाली काढली होती. मात्र, नंतरच्या काळात अंबानी कुटुंबीयांन असलेली सुरक्षा केवळ महाराष्ट्र राज्यापुरती आहे का, अशी विचारणा याचिकाकर्त्याने केली होती. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने अंबानी कुटुंबीयांना देशात आणि विदेशातही झेड प्लस सुरक्षा देण्याचा आदेशद दिला. त्यानुसार त्यांना सुरक्षा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्य म्हणजे या सुरक्षेचा संपूर्ण खर्च अंबानी कुटुंबीयच करणार आहे.
त्रिपुरा उच्च न्यायालयाने मागितले होते स्पष्टीकरण
त्रिपुरा येथील याचिकाकर्त्याने त्रिपुरा उच्च न्यायालयात अंबानी यांच्या सुरक्षेबाबत याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवरील निर्णयादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्याला हजर राहून अंबानी कुटुंबाला सुरक्षा पुरवण्याची गरज का आहे, असा प्रश्न उच्च न्यायालयाने उपस्थित केला होता. त्रिपुरा उच्च न्यायालयाचा हा आदेश खारीज सर्वोच्च न्यायालयाने २२ जुलै २०२२ रोजी मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय दिला होता.
धमकीचा मागितला होता अहवाल
केंद्रीय गृह मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष हजर राहमन अंबानी कुटुंबीयांना आलेल्या धमकीचा अहवाल सादर करण्याचा त्रिपुरा उच्च न्यायालयाने दिला होता, हे येथे उल्लेखनीय.
Ambani Family Foreign Tour Security Supreme Court