नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – गुजरातमधील अंबाजी तीर्थधाम येथे साऊंड अँड लाइट शोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाविकांना केले आहे. आज सायंकाळी 7 वाजल्यापासून 51 शक्तीपीठांचा परिक्रमा महोत्सव सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. आपली पुराणे साउंड आणि लाईट शोमध्ये प्रदर्शित केली जातील.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले; “गुजरातमधील अंबाजी तीर्थक्षेत्र येथे भाविकांसाठी एक अतिशय शुभ सोहळा आहे. 51 शक्तीपीठांच्या परिक्रमा महोत्सवाला आज सायंकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात होत आहे. या साउंड आणि लाईट शोमध्ये आपल्या पुराणांचे आकर्षक सादरीकरण केले जाईल. मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की या भव्य सोहळ्याचा भाग व्हा.”
https://twitter.com/narendramodi/status/1512340772082765824?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1512340772082765824%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpib.gov.in%2FPressReleasePage.aspx%3FPRID%3D1814843