मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आज मनमाडमध्ये कार्यकर्त्यांचा मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी मनमाडमध्ये दाखल झाले आहे. या मेळाव्यात जाण्यापूर्वी त्यांनी त्यांनी शिवसेना जिल्हप्रमुख गणेश धात्रक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. नुकतेच उद्धव ठाकरे यांचा राईट हँण्ड बदला अशी चर्चा रंगू लागली या विषयी विचारले असता तुम्ही निर्माण केलेली बातमी असून पुर्वीपासून रवी म्हात्रे हे उध्दव ठाकरे यांच्या बरोबर होते, लेफ्ट राईट असे काही नसून प्रत्येकाची एक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर शिंदे गटात खात्यांवरुन नाराजी नाट्य सुरु असून शिंदे गट असमाधानी आहे यावर बोलतांना ही असमाधानाची सुरुवात आहे, येणा-या काळात भारतीय जनता पार्टी काय काय करायला लावेल हे पहायला मिळेल आणि महाराष्ट्रही बघेल असेही त्यांनी सांगितले.