इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नागपूर मधील महाल येथे काल तणावपूर्ण निर्माण झालेली स्थिती ही राज्याच्या दृष्टीने भूषावाह नाही. गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशाप्रकारे जाळपोळीची घटना घडली. या दंगलीचे लोण दुसरीकडे पोहचता कामा नये. जिल्ह्यात धार्मिक उन्माद होत असताना राज्याच गुप्तचर खात झोपलेलं आहे का? नागरिकांनी फोन करूनही पोलीस रात्री उशिरा घटनास्थळी पोहचले असा आरोप विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.
यावेळी ते म्हणाले की, काही मंत्री दंगल भडकविण्याचं आणि जातीयवाद पसरविण्याचे काम करतात. त्या मंत्र्यांच तोंड शिवले पाहिजे, यामुळे अशी स्थिती निर्माण होते. त्यामुळे २८९ अनव्ये या घटनेवर चर्चा करावी आणि अशा घटनांना प्रतिबंध कराव्यात अशी मागणी सभागृहात केली.