इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनागरच्या जवाहर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोटाला शाई लावून, निवडणूक ओळखपत्र जमा करून घेऊन पैसे वाटप होत असल्याची बाब समोर आली आहे. या दरम्यान पोलिसांनी साधारण १८ लाखांची रक्कम जमा करून घेत अंदाजे २ कोटींची रक्कम आमदार संजय शिरसाट यांच्या फोननंतर सोडण्यात आल्याची माझी माहिती आहे. याचा अर्थ बहुदा निवडणूक आयोगाला संभाजीनगरात निःपक्षपाती निवडणूक घ्यायची नाही. ‘कर्तव्यदक्ष’ जिल्हाधिकारी आणि सगळी निवडणूक यंत्रणा असताना शाई कोणाच्या सांगण्यावरून आणि कशी बाहेर आली, हा प्रश्न आहे. याचा तातडीने निवडणूक आयोगाने खुलासा करायला हवा आणि प्रकरणात तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकून पोस्ट टाकली आहे. त्यात म्हटले आहे की, आता यापेक्षा मोठा पुरावा निवडणूक आयोगाला कोणता हवा! देवळाई तांडा भागातील हा प्रताप आहे. कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?