मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा तिसरा हप्ता महाराष्ट्रात वाटप झालेला असतांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मध्यप्रदेशात लाडली बहना योजना आता बंद होणार असल्याचे सांगत एक बातमी पोस्ट केली आहे.
त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, मध्यप्रदेशात लोकसभेला २६ पैकी २६ जागा भाजपला देणारी लाडली बहना योजना आता बंद होणार आहे! योजनेची ‘शून्य उपयुक्तता’ दाखवून या योजनेचा मध्य प्रदेशातून गाशा गुंडाळण्यात आला आहे. महाराष्ट्रात काय होणार त्याची ही पूर्वकल्पना आहे. इथेही हा इलेक्शन जुमला आहे! बस्स!! #लाडक्याबहिणीचादेवाभाऊ यावर बोलणार का?