– उद्योग जगत उभारणार २० ऑक्सिजन जनरेशन प्लांट
– आयमाने केले उद्योजकांना मदतीचे आवाहन
नाशिक –ऑक्सिजनच्या तुटवड्यावर कायमस्वरुपी पर्याय करण्याच्या दृष्टिकोनातून हवेतून ऑक्सिजनची निर्मिती करणारे प्लांट व तसेच आत्ताच्या दुसऱ्या लाटेमध्ये अतिशय उपयुक्त ठरलेले असे १००० नग ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट उपलब्ध करून देण्या करिता आयमाने पुढाकार घेऊन मोठ्या उद्योगांच्या सीएसआर निधीमधून जवळपास २० नग हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे प्लांट तसेच मध्यम व छोट्या उद्योगांच्या माध्यमातून १००० ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट देण्याकरता प्रयत्न सुरू केलेला आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज देण्याचे कबूल केले ३५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट उद्योजकांनी आज देण्याचे कबूल केले
सामाजिक बांधिलकीच्या नात्याने आयमाच्या माध्यमातून उद्योग जगत सुद्धा प्रशासनाबरोबर संपूर्ण सहकार्याची भूमिका घेऊन सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या दृष्टिकोनातून व सक्षम पणे मदत करणार आहे. आयमाच्या माध्यमातून आपण नाशिक मधील सर्व मोठ्या, लघु व मध्यम उद्योगांना मदतीचे आवाहन केले आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये मुख्यता कमतरता भासत असलेल्या व त्या आवाहनाला सर्व मोठे उद्योग लघु मध्यम उद्योग व वैयक्तिक उद्योजका कडून अतिशय सकारात्मक असा प्रतिसाद मिळत आहे. उद्योजकांनी स्वतःहून पुढे येऊन याकरता कामा मदत करण्याचे आश्वासन आयमा पदाधिकाऱ्यांना दिले आहे. याचाच भाग म्हणून आज आयमा मध्ये जवळपास ३५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट हे उद्योजकांनी आयमाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आज देण्याचे कबूल केले. त्याकरिता निधी तसेच प्रत्यक्ष ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आज एमआयडीसीचे विभागीय अधिकारी नितीन गवळी यांच्या उपस्थितीमध्ये आयमा पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. तसेच उद्योजक राजेंद्र कोठावदे व श्री लीदुरे यांनी आयमाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून त्यांची कंपनी धनराज स्विचगीयर प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून एक ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारून त्यामधून निर्माण होणारा सर्व ऑक्सिजन कोरोना संकट काळामध्ये सर्व कामगार उद्योजक तसेच शासनाला मोफत उपलब्ध करून देण्याचे आज जाहीर केले.
याप्रसंगी आयमाचे चेअरमन धनंजय बेळे यांनी बोलताना सर्व उद्योजकांना आयमा करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व आपण विविध मोठ्या कंपन्यांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांना यासाठी मदतीचे आवाहन केल्याचे सांगितले व सर्व लहान मध्यम उद्योगांकडून आम्ही निश्चित १००० कॉन्सन्ट्रेटर जमा करून शासनाला सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन गवळी यांना दिले.
अंबड मध्ये आय टी पार्क व त्यालागताच्या उद्योजकांच्या प्लॉट मध्ये साडेपाचशे खाटांचे ऑक्सिजनयुक्त कोविड सेंटर महानगर पालिके तर्फे उभे राहत असून त्या साठी देखील आयमाने संपूर्ण सहकार्य व पुढाकार घेतल्याचे सांगितले व त्यासाठी सुद्धा उद्याजकांचे संपूर्ण सहकार्य असल्याचे त्यांनी प्रतिपादन यावेळेस केले,
प्रारंभी निखिल पांचाळ यांनी आलेल्या सर्व प्रतिनिधींचे स्वागत केले.
याप्रसंगी नितीन गवळी यांनी बोलताना आयमा या संघटनेचे पदाधिकारी व उद्योजक करीत असलेली मदत व विशेष करून आयमाने घेतलेल्या हा जो संकल्प आहे हा येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटे करिता खूपच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करून आयमाच्या कार्याचे कौतुक केले. विशेषता गेल्या महिन्या भरा पासून धनंजय बेळे,निखील पांचाळ, ललित बूब हे आमच्या खांद्याला खांदा देऊन आमच्याबरोबर काम करीत असल्याचा विशेष उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला.
आयमाला या कामासाठी जी मदत आमच्याकडून लागेल ती सर्व मदत आम्ही करण्यास बांधील असल्याचेही त्यांनी या वेळेस नमूद केले. याप्रसंगी दहा नग कॉन्सन्ट्रेटर चा चेक किशोर राठी,५ नग कॉन्सन्ट्रेटर जयंत जोगळेकर यांनी तसेच दहा कॉन्सन्ट्रेटर इंनोवा रबर्स प्रायव्हेट लिमिटेड मार्फत, सिग्नेचर लिमिटेड या दिंडोरीच्या कंपनीचे हेड यतीन पटेल यांनी प्रत्यक्ष दोन कॉन्सन्ट्रेटर लंडनहून मागून आयमाकडे सुपूर्द केले व इतर उद्योजकांनी प्रत्येकी एक दोन असे जवळपास ३६ नग कॉन्सन्ट्रेटर यावेळेस देण्याचे कबूल केले.
तसेच आयमा आवाहनाला प्रतिसाद देऊन सी एस सिंग व सहकारी दोन उद्योजकांनी शंभर टनाचा लिक्विड ऑक्सीजन निर्मितीचा प्लांट उभारण्याचा मानस सुद्धा याठिकाणी व्यक्त करून त्यासाठीची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगितले हा छोटे खानी कार्यक्रम करोनाचे चे सर्व नियम पाळून आयमा रिक्रिएशन सेंटर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला आयमा चे माजी अध्यक्ष सुरेश माळी, ज्ञानेश्वर रेपाळे तसेच राजेंद्र अहिरे, गोविंद जा, सी एस सिंग, यतीन पटेल, किशोर राठी, अभिजित राठी, आदी उपस्थितीत होते.