नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – एकीकडे जगभरातील मोठ्या कंपन्या कर्मचारी कपात करत असताना दुसरीकडे अॅमेझॉनने क्लाउड क्षेत्रात प्रचंड गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, भारतात १.३२ लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत.
अमेझॉनने भारतातील क्लाउड सर्व्हिसेसमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. त्यानुसार, क्लाउड सर्व्हिस देणारी अमेझॉन वेब सर्व्हिसेज ( एमब्ल्यूएस) ने १,०५,६०० कोटी रुपये (१२.७ अब्ज डॉलर) ची गुंतवणूकीची घोषणा केली आहे. पुढील ८ वर्षांत कंपनीकडून होत असलेल्या या गुंतवणुकीच्या माध्यमातून भारतात दरवर्षी १,३१,७०० नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे, कंपनीचं ही घोषणा भारतात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देणार आहे. त्यामुळे, जागतिक मंदीतही भारतात संधी उपलब्ध असणार आहेत.
मॅन्युफॅक्चरींग, इंजिनिअरींग, दूरसंचार क्षेत्रात प्रामुख्याने नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. कंपनी नव्या गुंतवणुकीसह प्रामुख्याने इंफ्रास्ट्रक्चरचा पाया आणखी मजबूत करणार आहे. अमेझॉन कंपनीने सन २०१६ ते २०२२ या ६ वर्षांच्या कालावधीत भारतात मोठी गुंतवणूक केली आहे. तब्बल ३.७ अब्ज डॉलर म्हणजेच ३०,९०० कोटी रुपयांची गुंतवणूक आत्तापर्यंत कंपनीने केली आहे. मात्र, आता लाखो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून मोठी आर्थिक उलाढाल कंपनी भारतात करत आहे.
भारतात क्लाऊड संबंधित इन्फ्रास्ट्रक्चरची मागणी पाहता ही गुंतवणूक करण्यात येत आहे. डाटा सेंटर इंफ्रास्ट्रक्चरच्या गुंतवणुकीतून भारतीय व्यापारात दरवर्षी सरासरी १,३१,७०० नोकऱ्यांच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे. या नव्या गुंतवणुकीसह अमेझॉन कंपनीची भारतातील गुंतवणूक ही १,३६,५०० (१६.४ अब्ज डॉलर) पर्यंत जाण्याचा अंदाज आहे.
कंपनीचे भारतात २ डाटा सेंटर इन्फ्रास्ट्रक्चर आहेत. पहिल्याच वर्षी २०१६ मध्ये मुंबईत एक सुरू करण्यात आले होते, तर दुसरे डाटा सेंटर नोव्हेंबर २०२२ मध्ये हैदराबाद येथे सुरू करण्यात आलं आहे.
क्लाउड कॉम्प्युटिंगला संधी
एडब्ल्यूएसचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अॅडम सेलिपस्की म्हणाले, “एडब्ल्यूउस एक डिजिटल पॉवरहाऊस म्हणून भारताच्या आर्थिक वाढीसाठी दीर्घकाळापासून कार्यरत आहे. येथे पायाभूत सुविधांच्या माध्यमातून आम्ही २०१६ पासून केलेली ही भरभराट पाहून मी प्रेरीत झालो आहे.”
ते पुढे म्हणाले, इकॉनॉमिक टाईम्सच्या अहवालानुसार, जागतिक अनिश्चिततेच्या काळात भारत देश जगात “उज्ज्वल स्थान” प्राप्त करून आहे, जेथे व्यवसाय अधिकाधिक पुराणमतवादी होत आहेत, भारतात व्यवसाय आणि उद्योगांद्वारे क्लाउड कॉम्प्युटिंगचा अधिकाधिक अवलंब करण्यास लक्षणीय वाव आहे.
https://twitter.com/ukshahi/status/1659215025092038657?s=20
Amazon Web Services Big Investment Employment Generation in India