मुंबई – भारतात गेल्या काही वर्षात ऑनलाइन खरेदीला मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली असून प्रचंड प्रमाणावर ग्राहक याकडे आकर्षित होत आहेत. विशेषत: कोरोना काळात ऑनलाईन खरेदी मध्ये चांगलीच वाढ झाली आहे. याचाच फायदा घेत विविध सण उत्सव काळात अनेक कंपन्या वेगवेगळ्या ऑफर जाहीर करीत असतात. त्यातच ॲमेझॉनने रक्षाबंधन म्हणजे राखी पौर्णिमा सणासाठी विशेष सेल ऑफर जाहीर केली आहे.
अॅमेझॉन रक्षाबंधन सेल म्हणजेच अमेझॉनने राखी स्टोअरची घोषणा केली आहे, त्यामध्ये फॅशन, सौंदर्य, स्मार्टफोन, टीव्ही, होम डेकोर, किचन उपकरणे, चॉकलेट्स, अॅक्सेसरीज, पर्सनलाइज्ड गिफ्ट कार्ड्स यासारख्या राखी गिफ्टस उत्पादनांची ऑफर आहे. रक्षाबंधन हा सण अमेझॉनने भावा-बहिणीसाठी आपला दिवस खास बनवण्यासाठी अनेक सेल तथा गिफ्टची घोषणा केली आहे.
राखी आणि गिफ्ट हॅम्परच्या सहाय्याने ग्राहकांना मालाची उत्पादने, पाकीट, परफ्यूम, घड्याळे, पोशाख, वाद्ये, कॅमेरे, स्मार्टफोन, शूज, खेळणी आणि बोर्ड गेम, विविध चॉकलेट आणि बरेच काही परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता येतील. रक्षा बंधन हा सण यंदा दि. २२ ऑगस्ट रोजी असून तुम्ही तुमच्या भावाला किंवा बहिणीसाठी गॅझेट घेण्याचा विचार करत असाल तर आपण स्मार्टफोन, इयरबड्स सारखी गॅझेट कमी किंमतीत आणि आकर्षक ऑफर्सवर खरेदी करू शकता.
स्मार्टफोन रेडमी नोट 10
Redmi Note 10 Pro Max चे 6GB वेरिएंट हा 19,999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकतो. डिव्हाइसमध्ये 6.67-इंच सुपर AMOLED डिस्प्ले आहे. स्मार्टफोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 732 जी 6 जीबी व्हेरिएंटसह देण्यात आहे. यात 108 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये 50WmAh ची बॅटरी 33W फास्ट चार्जरसह आहे.
वनप्लस नॉर्ड सीई 5 जी स्मार्टफोन
वनप्लस नॉर्ड सीई 5 जी हा अॅमेझॉन राखी स्टोअरवर 22,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा AMOLED डिस्प्ले असून त्याचे रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल आहे. वनप्लस नॉर्ड सीई क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 750 जी 5 जी आणि 6 जीबी रॅमसह देण्यात येत आहे. स्मार्टफोन Warp Charge 30T पॉवर अडॅप्टरसह देण्यात येतो.
नवीन फायर टीव्ही स्टिक
नवीन फायर टीव्ही स्टिकची तिसरी ऐडीशन पूर्ण एचडीमध्ये जलद गतीसाठी 50 टक्के अधिक शक्तिशाली असल्याचे म्हटले जाते. अॅलेक्सा व्हॉइस रिमोट आपल्याला अॅप्सवर चित्रपट, शो आणि बरेच काही शोधण्यासाठी आणि लाँच करण्यासाठी आपला आवाज वापरता येतो. स्ट्रीमिंग डिव्हाइस 3999 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. त्याचप्रमाणे इको डॉट थर्ड जनरेशन राखी स्टोअर्सवर 2,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या डिव्हाइसचा वापर करून आपण अलेक्साला संगीत, बातम्या आणि सुसंगत स्मार्ट होम डिव्हाइस नियंत्रित करू शकता.
सोनी ब्राव्हिया अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्ही
सोनी ब्राव्हिया 55-इंच 4 के अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी गुगल टीव्ही हा अल्ट्रा एचडी 3840 x 2160 पिक्सेल आणि 60-हर्ट्ज रिफ्रेश रेटसह देण्यात येतो. यामध्ये सेट-टॉप बॉक्स, ब्लू-रे प्लेयर्स आणि गेमिंग कन्सोल कनेक्ट करण्यासाठी 4 एचडीएमआय पोर्टसाठी कनेक्टिव्हिटी समाविष्ट आहे. या स्मार्ट टीव्हीच्या वैशिष्ट्यांमध्ये गुगल टीव्ही, व्हॉइस सर्च, गुगल प्ले, नेटफ्लिक्स, अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ, एचडीआर गेमिंगचा समावेश आहे. अमेझॉनवर फक्त 78,990 रुपयांमध्ये हा उपलब्ध होऊ शकतो.
https://twitter.com/amazonIN/status/1425054300032716801