नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे देशभरातील रस्ते अपघातात संदर्भात नेहमीच काळजी घेत असतात. तसेच याबाबत वारंवार सूचना करून नागरिकांना आवाहन देखील करत असतात .आता त्यांनी या संदर्भात आणखी एक पाऊल उचलत कडक धोरण जाहीर केले आहे. त्यामुळेच अॅमेझॉन या इ कॉमर्स कंपनीला केंद्र सरकारने नोटीस बजावली आहे. त्यानुसार अॅमेझॉनला आता सीटबेल्ट अलार्म ब्लॉकर्सची विक्री थांबवावी लागणार आहे.
एका मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, बरेच लोक अॅमेझॉनवरून क्लिप खरेदी करतात ज्याचा वापर सीट बेल्ट अलार्म ब्लॉक करण्यासाठी केला जातो. या प्रोडक्टची विक्री थांबवण्यासाठी अॅमेझॉनला नोटीस पाठवण्यात आली आहे. कारण म्हणजे सीट बेल्ट लावलेला नसला, तरी बीप बीप साउंड येऊ नये, यासाठी केलेली ती व्यवस्था होती. एकदा मी ड्रायव्हर्सना दटावलं आणि त्या क्लिप्स काढून टाकल्या. हे पाहिल्यानंतर मी अशा क्लिप्सचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली.
भारतातील रस्ते अपघाताची मृत्यू होय. गेल्या काही वर्षात रस्त्याच्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे, त्यातच आता पुन्हा एकदा रस्त्याच्या अपघाताचा प्रश्न चर्चेत आला आहे, त्याला कारण म्हणजे टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधन होय, त्यानंतर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. कारमध्ये मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सीटबेल्ट न लावल्यास आरटीओकडून दंड आकारण्यास येईल.
आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा लागेल, म्हणजेच आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असेल. नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान ही घोषणा केली. भारतात रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 18 ते 34 वयोगटातील आहे. रस्ते अपघात कमी करणे हे एकमेव असे क्षेत्र आहे, जिथे मला गेल्या 8 वर्षात यश मिळालेले नाही, असे गडकरी पुढे म्हणाले.
गडकरी पुढे म्हणाले की, सायरस मिस्त्री अपघातामुळे मी ठरवले आहे की, ड्रायव्हरच्या सीटवर जसा सीट बेल्ट आहे तसाच मागील सीटवरही अलार्म असेल. कारमधील मागील सीटवर सीटबेल्ट न लावल्यास दंड आकारला जाईल. टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. यानंतर वेगाने धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
गडकरींनी स्पष्ट केले की, देशातल्या सर्वच नागरिकांनी रस्ते सुरक्षितता या विषयावर गांभीर्याने विचार करून, उदासीनता दूर केली पाहिजे, मानसिकता बदलली पाहिजे, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं, ‘मी चार मुख्यमंत्र्यांच्या कारमधून प्रवास केला आहे. मी त्यांची नावं सांगणार नाही. पण त्यांच्या कारमध्ये मी पाहिलेला प्रकार भयानक होता. मी ड्रायव्हरशेजारच्या सीटवर बसलो होतो. तिथे बेल्ट लावण्याच्या ठिकाणी एक क्लिप लावण्यात आली होती, असं मला दिसलं. त्याचं कारण म्हणजे सीट बेल्ट लावलेला नसला, तरी बीप बीप साउंड येऊ नये, यासाठी केलेली ती व्यवस्था होती. त्या क्लिप्स मी काढून टाकल्या. हे पाहिल्यानंतर मी अशा क्लिप्सचं उत्पादन आणि विक्रीवर बंदी घातली आहे एका अहवालानुसार मागील वर्षी भारतात रस्ते अपघातांमुळे १,५५,६२२ मृत्यू झाले आहेत आणि दर चार मिनिटांनी एक मृत्यू नोंद होत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र सरकारने अनेक निर्णय जाहीर केले आहेत.
Amazon Product Sale Banned Union Government Order