विशेष प्रतिनिधी, मुंबई
ई–कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉनने आपल्या सबस्क्रिप्शन प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे. अॅमेझॉनच्या वतीने सर्वात स्वस्त मासिक प्लॅन बंद करण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे युझर्सला आता १२९ रुपयांचा मासिक प्लॅन उपलब्ध होणार नाही.
अॅमेझॉनने आपल्या सपोर्ट पेजवर याची घोषणा करतानाच मोफत ट्रायल बंद होत असल्याचेही सांगितले आहे. नव्या युझर्सला आकर्षित करण्यासाठी मोफत ट्रायलची योजना होती. आता तीदेखील बंद होत आहे.
२७ एप्रिलला कंपनीने तसेही मोफत साईन–अप करण्याचा प्लॅन तात्पुरता बंदच केला होता. अॅमेझॉन प्राईमचा मन्थली प्लॅन बंद होण्यामागे कंपनीचा कुठलाच नवा उद्देश्य नसून रिझर्व्ह बँक आफ इंडियाचा नवा नियम आहे. आरबीआयने बँकांसाठी आटो डेबिटच्या नियमांचे पालन करण्यासाठी ३० सप्टेंबर पर्यंत डेडलाईन वाढवली आहे. त्याअंतर्गत अॅडिशनल फॅक्टर ऑथेंटिकेशन (एएफए) किंवा व्हेरिफिकेशनच्या इतर उपायांचा अवलंब करणे अनिवार्य केले आहे. त्यानुसार कार्ड किंवा प्रीपेड पेमेंट, युपीआय आदींचा वापर करताना आरबीआयच्या नियमांचे पालन होणार नाही तर ही व्यवस्था ३० सप्टेंबर नंतर कायम राहणार नाही, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
तीन महिन्यांचा प्लॅन
एक महिन्याचा प्लॅन अॅमेझॉनने रद्द केला असला तरही तीन महिन्यांसाठी ३२९ रुपयांचा प्लॅन सुरू राहील. तसेच ९९९ रुपयांचा वार्षिक प्लॅनही सुरू राहणार आहे. अॅमेझॉनने भारतात एक नवी मिनी टीव्ही व्हिडीओ स्ट्रीमिंग सर्व्हिस लॉन्च केली आहे.