विशेष प्रतिनिधी, मुंबई
प्रसिद्ध ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने “प्राइम डे २०२१” या महासेलच्या तारखांची नुकतीच घोषणा केली आहे. जगभरात “अॅमेझॉन प्राइम डे”ची सुरुवात अमेरिका, ब्रिटेन, तुर्की, स्पेन, सिंगापूरसारख्या अनेक देशांमध्ये २१ जूनला झाली होती. परंतु भारतात महासेलची सुरुवात २६ जुलैपासून होणार असून, तो २७ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे. अॅमेझॉनचा हा सर्वात मोठा सेल आहे. अॅमेझॉनच्या प्राइम सदस्यांसाठी हा सेल असेल.
दोन दिवसीय सेलदरम्यान अॅमेझॉनतर्फे विविध श्रेणींच्या उत्पादनांमध्ये सर्वत मोठी सवलत दिली जाणार आहे. यामध्ये ग्राहकांना आयफोनपासून ते सॅमसंग आणि इतर ब्रँडचे स्मार्टफोन कमी किमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. परंतु अॅमेझॉनने अद्याप सवलतीच्या दरांबाबत अद्याप खुलासा केलेला नाही.
विविध ऑफर
अॅमेझॉन प्राइम डे दरम्यान मोबाईल आणि एक्सेसरीजवर ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्यासह नो कॉस्ट ईएमआयचा पर्याय आणि एक्सचेंज ऑफर दिली जाणार आहे. ग्राहक प्रीमियम स्मार्टफोनच्या किमतीवर दहा हजार रुपयांच्या सवलतीचा लाभ घेऊ शकतील. नव्या मॉडेल्सवर ६,७९९ प्रति महिन्याची ईएमआय ऑफर मिळू शकेल. त्याशिवाय बेस्ट सेलिंग स्मार्ट फोनचा ईएमआय १४९९ रुपयांपासून असू शकणार आहे.
६९ रुपयांपासून अॅक्सेसरीज
अॅमेझऑन प्राइम डे सेलमध्ये ६९ रुपयांपासून अॅक्सेसरीज उपलब्ध असतील. शिवाय एचडीएफसी बँक डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या ईएमआयच्या व्यवहारावर दहा टक्के तत्काळ सवलतसुद्धा दिली जाणार आहे. महासेलची सुरुवात होण्यापूर्वी अॅमेझॉनने डिस्काउंट ऑफर दिलेल्या स्मार्टफोनचा टिझरही जारी केला आहे.
Xiaomi स्मार्टफोन
Xiaomi कंपनीने Redmi Note 10S नुकताच लाँच केला होता. या फोनचासुद्धा सेलमध्ये समावेश करण्यात येणार आहे. त्याशिवाय Redmi Note 10 Pro Max आणि Redmi 9A, Redmi 9 Power या फोनचा क्रेझी डिल्सअंतर्गतच्या यादीत समावेश असेल. एमआय ११ एक्स ५ जी आणि एमआय १० आय ५ जी लासुद्धा निवडण्यात आले आहे.
सॅमसंग फोन
सॅमसंगचे काही निवडक मॉडेल महासेलमध्ये सहभागी होणार आहेत. अॅमेझॉन प्राइम डे सेलमध्ये गॅलेक्झी सीरिजचे M31s आणि M51 सहभागी होणार आहेत, तसेच M31 आणि M12 या मॉडेल्सचा क्रेझी डिल्सअंतर्गत समावेश केला आहे. त्याशिवाय गॅलेक्झी M42 5G, M11 आणि गेल्या वर्षी लाँच झालेला Note 20 च्या खरेदीवर ग्राहकांना सवलत मिळणार आहे.
अॅपल फोन
सर्वात जास्त किंमत असलेले फोन म्हणून अॅपलच्या स्मार्टफोनची ओळख आहे. या महासेलमध्ये कमी किमतीत या ब्रँडेड मोबाईलला तुम्ही खरेदी करू शकणार आहात. कंपनीचे प्रसिद्ध असे iPhone 12 Pro मॉडेलसुद्धा या महासेलमध्ये सहभागी होणार आहे. ओप्पो, आयको आणि टेक्नोच्या स्मार्टफोनचाही समावेश असेल.