मुंबई – अॅमेझॉन ग्रेट फ्रीडम फेस्टिव्हल सेलची घोषणा करण्यात आली आहे. येत्या ५ ऑगस्टपासून ही ऑफर सुरू होणार आहे. ही ऑफर ५ दिवसांची असून विक्री ९ ऑगस्ट रोजी रात्री ११.५९ पर्यंत सुरू राहील. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, कॅमेरा, स्मार्ट टीव्हीसह इलेक्ट्रॉनिक उत्पादनांच्या खरेदीवर मोठ्या सवलत ऑफर दिल्या जात आहेत.
या ऑफरमध्ये एसबीआय क्रेडिट आणि क्रेडिट ईएमआयवर ग्राहकांना १० टक्के सूट मिळू शकेल. अॅमेझॉन प्राइम मेंबर ग्राहकांना स्मार्टफोन खरेदीवर ३ महिने नो कॉस्ट ईएमआय आणि ६ महिन्यांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा दिली जात आहे. तसेच, Oppo, Vivo आणि Samsung फीचर फोनच्या खरेदीवर ६५० रुपयांची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे. तसेच, जुने स्मार्टफोन एक्सचेंज करताना ३,५०० रुपयांची सूट देण्यात येत आहे.
स्मार्टफोनवर देखील सवलत मिळत आहे.Tecno Pova 2 स्मार्टफोन अॅमेझॉन सेलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच OnePlus Nord 2 5G, OnePlus Nord CE 5G, Redmi Note 10T 5G, Redmi Note 10s, Mi 11x, Samsung M 21, Samsung M 32, Samsung M42 5G, iQOO Z3 5G, iQOO 7, Tecno Camon 17 Series, Tecno Spark Go Like असे स्मार्टफोन या सेलमध्ये उपलब्ध करून दिले जाईल. या स्मार्टफोनच्या खरेदीवर जास्तीत जास्त 40 टक्के सूट देण्यात येत आहे. तसेच, मोबाईल अॅक्सेसरीज खरेदी करण्याचा पर्याय दिला जात आहे.