मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ॲमेझॉन ही जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असून त्याचा वापर भारतातील बहुतांश लोक ऑनलाइन शॉपिंगसाठी करतात. आणि बहुतेक लोक “कॅश ऑन डिलिव्हरी” पद्धतीने खरेदीसाठी पैसे देतात. हे लक्षात घेऊन ॲमेझॉनने ॲमेझॉन पे ॲप सेवा सुरू केली.
ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवरून वस्तूंची खरेदी करणे आता स्वस्त राहणार नाही. अॅमेझॉनवरून कमी किंमतीत वस्तू खरेदी करायच्या असतील तर ३१ मे पर्यंतचाच वेळ आहे. त्यानंतर कोणतीही वस्तू घेतली तर जादा पैसे द्यावे लागणार आहेत. अॅमेझॉन आपल्या सेलर फी आणि कमिशन चार्जमध्ये मोठा बदल करणार आहे.
अॅमेझॉन प्रॉडक्ट रिटर्न फीला वाढविणार आहे. अॅमेझॉन व्हेंडरकडून कमिशन आणि फी गोळा करून कमाई करते. सुधारित शुल्क ३१ मे पासून लागू केले जाणार असल्याचे कंपनीने अलिकडेच जाहीर केले होते. कपडे, सौंदर्य, किराणा आणि औषध अशा अनेक श्रेणींच्या दरात वाढ करणार आहे. त्यामुळे ऑनलाईन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा भुर्दंड बसणार आहे.
ॲमेझॉनवर ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीच्या खरेदीसाठी सुमार ५ टक्के ते १२ टक्के विक्रेता शुल्क आकारले जाईल. ५०० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या खरेदीवर १५ टक्के सेलर फी लागू होईल. १ हजार रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर सुमारे २३ टक्के विक्रेता फी लागू होण्याची शक्यता आहे. सौंदर्य विभागात ३०० रुपयांपेक्षा कमी किमतीच्या उत्पादनांवर कमिशन सुमारे टक्के करण्यात येणार आहे. देशांतर्गत वितरण शुल्कातही सुमारे २२ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. एकंदरीतच ग्राहक म्हणून आता ई कॉमर्स साईटवर जादा पैसे मोजावे लागणार आहेत. याबद्दल ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Amazon E commerce Website Online Shopping Costly