मुंबई – जगातील सर्वांत श्रीमंत माणसाने नोकरीचा किंवा पदाचा राजीनामा दिल्यानंतरही त्याला काही फरक पडणार नाही, हे आपल्याला माहिती आहे. मात्र सेलिब्रिटी माणसाचा राजीनामा कायम चर्चेत असतो. तसेच सध्या अमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस यांच्याबाबतीत सुरू आहे. त्यांनी अमेझॉनच्या सीईओपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता त्यांची सेकंड इनिंग कशी असेल, ते काय करतील, असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झाले आहेत.
जेफने २७ वर्षांपूर्वी अमेझॉनची स्थापना केली होती. आता त्याच कंपनीतील सीईओ पद सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतल्यामुळे सर्वांना धक्का बसला. पण तरीही ते अमेझॉन ब्रॅंडचे कार्यकारी अध्यक्ष असतील आणि कंपनीतील सर्वांत मोठे शेअर होल्डरदेखील राहतील. ५७ वर्षांच्या जेफने एका गॅरेजच्या माध्यमातून कंपनीची सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण जगात जाळे पसरले.
आता अमेझॉनचा एवढा विस्तार झाला असताना, पसारा वाढला असतावा त्यांनी जबाबदारीतून मुक्त होत आपले विश्वासून लेफ्टनंट अँडी जेसी यांच्याकडे धुरा सोपवली आहे. जेफ या महिन्याच्या अखेरीस अंतराळाच्या सफरीवर निघणार आहे. आज त्यांची गणना जगातील सर्वांत श्रीमंत लोकांमध्ये होत असली तरीही त्यांचा प्रवास अत्यंत कठोर होता. जेव्हा कंपनीची स्थापना केली तेव्हा सारी कामं ते एकटे करायचे.
आज अमेझॉनवर आपल्याला सेम डे डिलिव्हरी मिळते, पण त्यावेळी ते एवढे सोपे नव्हते. तेव्हा आर्डर मिळाल्यावर ते स्वतःच पॅकेजिंग करायचे आणि पोस्ट आफिसपर्यंत पोहोचवायचे. हळूहळू सारेकाही आनलाईन प्लॅटफॉर्मवर आल्यामुळे ही कल्पना अमेरिकेच्या बाहेर निघून जगभरात पोहोचली. आता अमेझॉनने ई-कॉमर्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्लाऊड कम्प्युटिंग, डिजीटल स्ट्रीमिंगमध्येही आपले जाळे पसरले आहे.
भारतातील आठवणी
२०१४ मध्ये जेफ भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी एका ट्रकच्या ड्रायव्हिंग सीटवर बसून छायाचित्र काढून घेतले होते. हे छायाचित्र चांगलेच व्हायरल झाले होते. त्यांच्या भारत दौऱ्याच्या अगदी एक वर्षांपूर्वीच अमेझॉनने भारतात पाऊल ठेवले होते. भारतीय बाजारपेठेत त्यांनी कोट्यवधी डॉलरची गुंतवणुक केली. इथे त्यांनी आपली एक शॅडो कंपनीही स्थापन केलेली आहे.
असा आहे फ्युचर प्लान
सर्वांत पहिले अंतराळाची सफर करणे, त्यानंतर चित्रपट क्षेत्रात प्रवेश करणे आणि आपल्यावर प्रेम करणाऱ्यांबद्दल परोपकार व्यक्त करणे या तीन उपक्रमांचे नियोजन जेफने केले आहे. नवी उत्पादने आणि नव्या वैशिष्ट्यपूर्ण प्रकल्पांवर विशेष जोर असेल, असे जेफचे म्हणणे आहे.