पुणे – आजच्या काळात मोबाईल किंवा स्मार्टफोन महत्त्वाची गरज बनली आहे. त्यामुळे आपल्या देशात मोबाईल तथा स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे स्मार्टफोन असावा, असे प्रत्येकालाच वाटते.
आपणही नवीन अॅपल आयफोन (Apple iPhone ) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आपल्याला आता नवीन वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. कारण शॉपिंग वेबसाइट अॅमेझान इंडियावर (Amazon India ) iPhone 12 Pro स्मार्टफोन 42 हजार रुपयांपर्यंत सूट मिळवून खरेदी करू शकता. डिस्काउंट व्यतिरिक्त, फोनवर स्वतंत्रपणे एक्सचेंज ऑफर आहे. या स्मार्टफोनच्या ऑफर बद्दल आणखी जाणून घेऊ या..
काय आहे संपूर्ण ऑफर
सदर iPhone 12 Pro चे 128 GB व्हेरिएंट Amazon वर 94,900 रुपयांना विकले जात आहे. तर या फोनची खरी किंमत 1,19,900 रुपये आहे. म्हणजेच 25 हजार रुपयांनी स्वस्तात फोन विकतोय. यासोबतच या वेरिएंटवर 15,000 रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील आहे. तसेच 256 जीबीचे मॉडेल 30 हजार रुपयांच्या सवलतीनंतर 99,990 रुपयांना विकले जात आहे आणि त्याचप्रमाणे 512 जीबीचे मॉडेल 42 हजार रुपयांच्या सवलतीनंतर 1,07,900 रुपयांना विकले जात आहे.
iPhone 12 Pro ची वैशिष्ट्ये
आयफोन 12 प्रो मॉडेल 2020 मध्ये लॉन्च करण्यात आले होते. हा फोन 460 ppi च्या पिक्सेल घनतेसह 1170×2532 पिक्सेल रिझोल्यूशनसह 6.10-इंच टचस्क्रीन डिस्प्लेसह देण्यात येतो. स्मार्टफोनमध्ये हेक्सा-कोर Apple A14 बायोनिक प्रोसेसर देण्यात आला आहे. iPhone 12 Pro वायरलेस चार्जिंग तसेच जलद चार्जिंगला सपोर्ट करतो. यात धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग आहे. तसेच यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फीसाठी, यात 12-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन गोल्ड, ग्रेफाइट, पॅसिफिक ब्लू आणि सिल्व्हर या चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपळब्ध आहे.