मुंबई – नवरात्र उत्सव, दसरा आणि दिवाळी यासारख्या सणासुदीचा काळ जवळ आल्याने आता विविध प्रकारचे ऑनलाईन आणि ऑफलाईन सेलची जणू काही स्पर्धा सुरू झाली आहे. त्यातच फ्लिपकार्ड आणि अमेझॉन यांनी ऑनलाईन सेलची घोषणा केली आहे. तथापि, फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन सेलच्या तारखा जवळ जवळ आल्याने या बाबत वाद झाला होता, परंतु आता हा वाद मिटला आहे.
फ्लिपकार्टने सर्वप्रथम बिग बिलियन डेज सेलची घोषणा केली. हा सेल ७ ते १२ ऑक्टोबर पर्यंत सुरू राहणार होता, परंतु फ्लिपकार्टची प्रतिस्पर्धी ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनने ४ ऑक्टोबर रोजी वार्षिक सेलची तारीख जाहीर केली, त्यामुळे फ्लिपकार्टची विक्रीची तारीख देखील ३ ऑक्टोबर म्हणजेच अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या एक दिवस अलीकडे करण्यात आली. अशा प्रकारे फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉन दरम्यान वाद संपला. आता शेवटी अमेझॉन आणि फ्लिपकार्टची विक्री एकामागोमाग एक तारखेला सुरू होईल.
फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनचे प्राइम मेंबर्स या दोन्ही विक्रीचा एक दिवस आधी खरेदीचा आनंद घेऊ शकतील. फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक उत्पादनांवर मोठी सूट दिली जाईल. तसेच बँक ऑफर, कार्ड सूट, नो-कॉस्ट ईएमआय, इन्स्टंट डिस्काउंटसह इतर अनेक फायदे दिले जातील. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये विविध उत्पादनांवर ८० टक्के आणि स्मार्टवॉचवर ७० टक्के तर डिझो उत्पादनांवर ६० टक्के सूट देण्यात आली आहे. तसेच इंटेल लॅपटॉपवर ४० टक्के सूट घेऊ शकतील. तसेच लॅपटॉप, स्मार्ट वेअरेबल्स, हेडफोन, स्पीकर्स आणि इतर उत्पादनांवर ८० टक्के सूट दिली जाईल.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल दरम्यान अमेझॉन अलेक्सा, फायर टीव्ही स्टिक, किंडल आणि इको शो सारख्या उत्पादनांवर जास्तीत जास्त ५० टक्के सूट दिली जात आहे. तसेच, नो कॉस्ट ईएमआयचा लाभ विक्रीतील उत्पादनांच्या खरेदीवर मिळू शकतो. याशिवाय एक्सचेंज ऑफरची सुविधा उपलब्ध असेल. त्याच वेळी इलेक्ट्रॉनिक्स आणि अॅक्सेसरीजवर ७० टक्के सूट मिळणार आहे.