मुंबई – सध्या आले अलेक्साचा सर्वत्र बोलबाला सुरू असून आता अॅमेझॉन अलेक्सा वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. या कंपनीने पहिल्यांदाच, भारतातील सध्या आणि नवीन वापरकर्त्यांसाठी ‘ व्हॉईस (आवाज ) ऑफ सेलिब्रिटी ‘ लॉन्च केले आहे. त्यामुळे आता वापरकर्ते अॅमेझॉन अलेक्साद्वारे मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्याशी बोलू शकतील.
नवीन वैशिष्ट्याच्या मदतीने, वापरकर्ते आता बिग बींचा आवाज ऐकू शकतील आणि त्यांच्या कविता, तसेच अमिताभ यांच्याच आवाजात त्यांचे वडील स्व. हरिवंशराय बच्चन यांच्या कविता, चित्रपट संवाद आणि त्यांच्या चित्रपटातील गाणी ऐकू शकतील. अलेक्सा वापरकर्त्यांना अमिताभ बच्चनचा आवाज डिव्हाइसमध्ये जोडण्यासाठी वर्षाला फक्त १४९ रुपये द्यावे लागतील.
वापरकर्ते माइक आयकॉनचे बटन दाबून अॅमेझॉन शॉपिंग अॅपमध्ये बिग बींचा आवाज जोडू शकतात. या व्यतिरिक्त, वापरकर्ते अमिताभ बच्चनचा आवाज डिव्हाइसमध्ये जोडण्यासाठी ‘अलेक्सा, मला अमिताभ बच्चनशी परिचय करा’ असेही म्हणू शकतात. पैसे भरल्यानंतर वापरकर्ते बिग बींच्या आवाजाशी संवाद साधू शकतील. बिग बींचा आवाज ऐकण्यासाठी, वापरकर्ते अलेक्साला ‘अलेक्सा, अमित जी वेक वर्ड सक्षम करा’ ही आज्ञा देऊ शकतात. वापरकर्त्यासाठी हा एक अतिशय मनोरंजक अनुभव असेल. जर तुम्ही अलेक्साला आज्ञा दिली की ‘अमित जी आज माझा वाढदिवस आहे’, बिग बी तुम्हाला खूप खास वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील.
अलेक्सा काय आहे
अलेक्सा ही एक प्रकारे सिस्टीम मधील सॉफ्टवेअर असून ती क्रोटन विंडोज 10 या सॉफ्टवेअरच्या मदतीने तयार करण्यात आलेली आहे. जेव्हा तुम्ही अलेक्सा हा शब्द उच्चारता तेव्हा ते उत्पादन तुमचे म्हणणे ऐकून घेऊन त्यानुसार कृती करण्यास सुरुवात करेल. अलेक्सा ला प्रश्न विचारून तुम्ही उत्तरे देखील मिळवु शकता. तुम्ही अलेक्साला कुठलाही प्रश्न विचारा, ती नक्कीच उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. उदाहरणार्थ, आज नाशिक किंवा पुण्यातील वातावरण कसे असेल? अस विचारले तरीही ती नक्कीच उत्तर देईल.
अलेक्सा म्हणजे एक क्लाऊड बेस्ड सर्विस आहे जी तुम्हाला उत्पादन चांगल्या पद्धतीने वापरायला मदत करते. खरं म्हणजे एलेक्सा हा एक शब्द असून ॲमेझॉन मधील त्या उत्पादनाला तुमचे म्हणणे ऐकण्याची चालना मिळते. टेक्निकल भाषेत सांगायचं झाले तर अलेक्सा ही एक ट्रीगरींग वर्ड आहे ज्यामुळे डिवाइस तुमचं म्हणणं ऐकून घेतो आणि त्यानुसार प्रोसेस सुरू करते. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स मधीलच एक चांगले उदाहरण म्हणजे अलेक्सा आहे. ॲमेझॉनच्या म्हणण्यानुसार अलेक्सा व्हॉईस सर्व्हिस म्हणजेच ए व्ही एस क्लाऊड मध्ये स्थित आहे. तुम्ही अलेक्सा चा वापर मायक्रोफोन किंवा स्पीकर च्या माध्यमातून केव्हाही करू शकता. अलेक्सा मध्ये नवीन कौशल्य विकसित करण्याचा अॅमेझॉन नेहमीच प्रयत्न करत आहे, असे ॲमेझॉनच्या डेव्हलपर साईट वर सांगण्यात आले आहे.