बेंगळुरू – देशातील लाखो लहान स्थानिक स्टोअर्सच्या डिजिटायझेशनला गती देण्यासाठी अमेझॉन इंडियाने अमेझॉन संभव समीटच्या तिसऱ्या सिझनची १८ आणि १९ मे २०२२ रोजी आयोजित करण्याची घोषणा केली आहे. या दोन दिवशीय व्हर्च्युअल समिटमध्ये देशातील लाखो लहान स्थानिक स्टोअर्स आणि व्यवसायांचे डिजिटलायझेशन आणि आर्थिक प्रगती सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा लाभ घेण्याच्या सर्वोत्तम पर्यायांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या चर्चेत धोरण निर्माते, प्रख्यात उद्योजक, समाधान प्रदाते आणि स्टार्टअप अमेझॉनच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शन घेतील. सर्वसमावेशक आर्थिक वाढीसाठी सामाजिक आणि सक्षमीकरण भारतासाठी नवनवीन शोध आणि डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करण्यासह अनेक बाबींवर यात लक्ष केंद्रित केले जाईल. महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करताना सर्व उद्योगांमध्ये तंत्रज्ञानाच्या अवलंबनाच्या महत्त्वावर मुख्य सूचना, पॅनेल चर्चा, मास्टरक्लास आणि बरेच काही या शिखर परिषदेत असेल. समीटसाठी नोंदणी amazon.in/smbhav वर सुरू झाली आहे.
आपापल्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती करत आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यात योगदान देणाऱ्यांना प्रदान करण्यात येणारा अमेझॉन संभव पुरस्कार हा या समीटचे मुख्य आकर्षण आहे. गेल्या वर्षी १२०० हून अधिक व्यवसाय, नवोदित आणि व्यक्तींनी ११ श्रेणींमध्ये संभव पुरस्कारांसाठी अर्ज केले होते. या वर्षी अमेझॉन संभव पुरस्कारात १५ विविध श्रेणींचा समावेश केला जाणार आहे. अल्पावधीत किंवा खडतर प्रवासातून यशस्वी व्यवसाय साखर करणाऱ्याला हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील.
अमेझॉन इंडियाचे देशातील कंझ्युमर बिझनेस व्यवस्थापक मनीष तिवारी यांनी म्हणाले की आम्ही छोट्या व्यवसायासाठी, विशेषत: लहान स्थानिक स्टोअर्स आणि किराणा शॉप्स डिजिटली सक्षम करण्यासह नवीन नवीन गोष्टींसाठी वचनबद्ध आहोत. अमेझॉन संभव २०२२ मध्ये अनेक धोरणकर्ते, सुप्रसिद्ध कॉर्पोरेट नेते, यशस्वी आधुनिक उद्योजक, तरुण उदयोन्मुख व्यवसाय मालक आणि ऍमेझॉनचे नेते यांना एकत्र आणून चर्चा करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. ज्यामुळे भारताचा विकास१ ट्रिलियन डिजिटल अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचेल. अमेझॉन प्रथमच देशातील प्रमुख शहरांमध्ये प्रादेशिक समीट मालिकेस या उपक्रमाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल.