नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महाभारत, रामायण आणि पुराण ग्रंथांमध्ये ब्रह्मदेव, विश्वकर्मा यांच्यासह अनेक देव देवता यांनी अमरावती, इंद्रप्रस्थ, सोन्याची लंका यासारखी अत्यंत सुंदर आणि आकर्षक नगरे वसवली असल्याचे उल्लेख आढळतात. त्याचप्रमाणे प्राचीन भारताच्या इतिहासात देखील अनेक राजे-महाराजे आणि सम्राटांनी वेगवेगळ्या प्रांतांमध्ये अत्यंत आकर्षक अशी नगरे उभारण्याचा देखील उल्लेख आहे.
मुगल साम्राज्याच्या पूर्व कालखंडात मोहम्मद तुगलक यांनी दिल्लीवरून आपली राजधानी दौलताबाद येथे आणल्याचा उल्लेख आढळतो. सरदार मलिक अंबरने देखील औरंगाबाद शहराची निर्मिती केली होती, या सर्वात शहराचे वर्णन ऐकताना आपल्याला तेथील सोयी सुविधा किती चांगल्या होत्या! हे आढळून येते. आधुनिक काळात देखील अशाच प्रकारची राजधानीची नगरे वसविलेले आढळतात. तरीही जगभरात सिंगापूर, लंडन, टोकियो, पॅरीस, कॅनडा, न्यूयॉर्क आणि मास्को या सारख्याच अत्यंत आकर्षक सुंदर काही मोजक्याच शहरांचा वारंवार उल्लेख होतो. परंतु आपण हॉलिवूड मधील एखाद्या आगळ्यावेगळ्या चित्रपटातील शहरे प्रत्यक्षात पाहिली आहेत का नाही ना परंतु आता लवकरच जगभरातील नागरिकांना असे शहर प्रत्यक्षात बघावयास मिळणार आहे.
लंडनपेक्षाही 17 पट मोठे आणि अत्याधुनिक अशा सर्व सुखसोयींनी सुसज्ज असे शहर बसविण्याची संकल्पना, योजना सौदी अरेबिया तेथील अमीर राजाने मांडली आहे. एखाद्या गोष्टी संदर्भात उल्लेख करताना आपण त्यापेक्षा 17 पट मोठे वैगेरे. अशाप्रकारे 17 या अकांचा उल्लेख होतो. त्यामुळे आता लंडन पेक्षा 17 पट आमचे शहर अत्यंत सुंदर आणि आकर्षक आणि अत्याधुनिक सोयींनी सुसज्ज असल्याचा दावा भविष्यात सौदी अरेबियाचे नागरिक करतील यात यात काही शंकाच नाही.
सुमारे 500 अब्ज डॉलर्स खर्च
सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांना दुबई, कतार, दोहा येथील निओम शहराला सर्वात मोठे बनवायचे आहे. सौदी अरेबिया हे नवे शहर जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेवर वसवणार आहे. त्याचे नाव NEOM आहे, ते हॉलीवूडच्या सायन्स फिक्शन चित्रपटासारखे असेल. या स्वप्नांच्या शहरात रोबोट सेवा देतील, हवेत कार धावतील, इथे पवन उर्जेपासून आणि सौरऊर्जेपासून वीज मिळेल. शहरात उडत्या टॅक्सी असतील आणि इथे फक्त इमारती बांधल्या जाणार नाहीत, तर या शहराला स्वतःचा चंद्र असेल, इतकेच नव्हे तर स्वतःचे ढगही असतील, ते प्रत्यक्षात पाऊस पाडतील. या शहरासाठी सुमारे 500 अब्ज डॉलर्स खर्च येईल.
फ्लाइंग टॅक्सी
एका रिपोर्टनुसार,सन 2025 पासून नागरिक या हायटेक NEOM शहरात राहायला सुरुवात करतील. विशेष म्हणजे हे शहर लंडनपेक्षा 17 पट मोठे असेल. NEOM शहराचे अध्यक्ष क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आहेत. ड्रोन फ्रेंडली असण्यासोबतच हे शहर रोबोटिक्सचेही केंद्र असेल. शहराच्या नियोजनाच्या कागदपत्रांनुसार, NEOM मध्ये फ्लाइंग टॅक्सी असतील. सौदी अरेबियाचे प्रिन्स सलमान NEOM ला दुबई, दोहा आणि कतारपेक्षा मोठे व्यावसायिक केंद्र बनवू इच्छित आहेत. या कामासाठी प्रिन्स हे पाण्यासारखा पैसा खर्च करायला तयार आहे. NEOM शहराला सर्वात हायटेक बनवण्यासाठी सौदी अरेबिया एकापेक्षा जास्त व्यावसायिकांना ते कॉल करत आहेत.
रोबोट घरे स्वच्छ करतील
NEOM सिटीमध्ये घराची साफसफाई करण्याचे काम रोबोट्स करणार आहेत. सौदी अरेबियामध्ये पाण्याची कमतरता असली तरी येथे पाऊस पडत नाही, परंतु NEOM मध्ये अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही, कारण क्लाउड सीडिंगच्या मदतीने या शहरात ढग देखील तयार होतील, जे प्रत्यक्षात पाऊस पडतील. याशिवाय ‘रोबोट मार्शल आर्ट्स’च्या मदतीने सौदी अरेबिया लोकांना या शहराकडे आकर्षित करण्याची तयारी करत आहे. या सर्वांशिवाय, शहराने स्वतःचा चंद्र बनवण्याची योजना आखली आहे, तो दररोज रात्री NEOM ला त्याच्या तेजाने प्रकाशित करेल.
2017 मध्ये घोषणा
सन 2017 च्या दरम्यान, सौदी अरेबियाने रियाधमधील ‘फ्यूचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटिव्ह’ कार्यक्रमात NEOM सिटीची घोषणा केली. यावेळी रोबोटिक्स फर्म बोस्टन याबाबत डायनॅमिक्सचे सीईओ मार्क रॉयबर्ट म्हणाले, की, महानगरांमध्येही सुरक्षेसाठी रोबोटचा वापर केला जाऊ शकतो. तसेच सुरक्षा, लॉजिस्टिक, होम डिलिव्हरी, वृद्ध आणि आजारी व्यक्तींची काळजी यासारखी कामे रोबोट्स सहज करू शकतात. मार्क याने या सर्व गोष्टी सांगितल्या, कारण हे सर्व करण्यासाठी त्याने मोठी योजना तयार केली आहे. याकरिता एवढा पैसा खर्च होईल जो अद्याप जगातील कोणत्याही शहराच्या उभारणीसाठी खर्च झाला नाही.
अनेक कठीण आव्हाने
सौदी अरेबिया जी स्वप्ननगरी वसवण्याच्या तयारीत आहे, त्याच्या मार्गातील अडचणी खूप आहेत. यात सर्वप्रथम, अडचण अशी आहे की ज्या उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे तो रोबोट, कृत्रिम चंद्र, कृत्रिम ढग बनवण्याचा विचार करत आहे, ते कितपत सुरक्षित असतील याबद्दल तज्ज्ञांचे एकमत नाही. सौदी अरेबियासमोरील दुसरी सर्वात मोठी समस्या मानवी हक्क कार्यकर्त्यांची आहे, कारण ते पाश्चात्य देशांच्या सर्वोच्च कंपन्यांना सौदी अरेबियाच्या प्रकल्पात सहभागी न होण्याचे आवाहन करत आहेत. 2018 पासून सौदी अरेबियाला अनेक प्रकरणात बरीच आंतरराष्ट्रीय बदनामी मिळाली आहे. अशा परिस्थितीत दुबई, दोहा आणि कतारमध्ये ज्या प्रकारे सुरक्षेबाबत वातावरण आहे, तशी सौदी अरेबिया आपली प्रतिमा तशी बनवू शकेल का? हाच मोठा प्रश्न आहे.