मुंबई – कार हे आजच्या काळातील जणू काही अत्यावश्यक वाहन झाले आहे. एखाद्या कुटुंबाला पर्यटन स्थळी किंवा बाहेरगावी जाण्यासाठी कार उपयुक्त ठरते. त्यामुळे कारमध्ये साधारणत : ४ ते जास्तीत जास्त ८ जण बसून जाऊ शकतात. परंतु एखाद्या कारमध्ये ७० जण बसले तर कुणालाही आश्चर्य वाटेल, परंतु हे शक्य आहे, कसे काय?
एका कारची जगातील सर्वात लांब कार म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल. पण १९८६ मध्ये, ही कार आली. या कारची लांबी १००फूट होती. ही कार एखाद्या गाडीपेक्षा ट्रेनसारखे दिसते. ‘अमेरिकन ड्रीम ‘ असे या कारचे नाव होते. या आगळ्यावेगळ्या कारच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेणार आहोत.
मिनी गोल्फ कोर्स, हेलिपॅड
जास्त लांबी व्यतिरिक्त, ही कार तिच्या वैशिष्ट्यांसाठी देखील लोकप्रिय आहे. कारण या कारमध्ये वैयक्तिक हेलिपॅड, एक मिनी गोल्फ कोर्स, जकूझी, बाथटब, एकाधिक टीव्ही, फ्रिज, टेलिफोन आणि एक स्विमिंग पूल देखील होता. साहजिकच ही कार आजच्या महागड्या आलिशान गाड्यांपेक्षा खूप पुढे होती. कारमध्ये ७० जणांची बसण्याची व्यवस्था होती.
कारची एकूण चाके
विशेष म्हणजे ती कार दोन्ही बाजूंनी चालवता येत होती. तिला एकूण १६ चाके होती. ‘अमेरिकन ड्रीम ‘ या कारची रचना जय ओहरबर्गने केली आहे. हॉलिवूड चित्रपटांसाठी ते प्रसिद्ध वाहन डिझायनर होते. ओहरबर्गला कारची आवड होती आणि त्याने स्वतःसाठी अनेक आश्चर्यकारकपणे डिझाइन केलेली वाहने तयार केली. अमेरिकन ड्रीमची रचना १९८० मध्ये करण्यात आली होती. ही कार बांधण्यासाठी आणि रस्त्यावर येण्यासाठी १२ वर्षे लागली.
एका तासाचे भाडे
या कारचे बोनेट हेलिपॅड म्हणून काम करत होते. या मोठ्या कारचे इंजिनही मजबूत होते, त्यामुळे त्यात अनेक V8 इंजिने देण्यात आली होती. आणखी एक गोष्ट जाणून आश्चर्य वाटेल की, एवढी लांब कार असूनही ती मधूनच वळू शकत होती. ती कार चित्रपटांमध्ये वापरण्यासाठी बनवली गेली. ज्या श्रीमंत व्यक्तींकडेही कार होती ते ही कार भाड्याने देत असत. त्यावेळी या कारचे एका तासाला भाडे १४ हजार रुपये होते.