इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – काहीवेळा असे घडते जेव्हा तंत्रज्ञानाचे चमत्कार नजरेसमोर येतात. असेच एक आश्चर्यकारक उदाहरण चीनमधील शांघाय शहरातून समोर आले आहे, जेव्हा तेथे शंभर वर्षे जुनी इमारत अचानक धावू लागली. यंत्राच्या साहाय्याने ती इमारत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवली गेली आणि ती इमारत तशीच उभी राहिली तेव्हा हे सर्व घडले. याचा एक व्हिडिओही समोर आला आहे.
वास्तविक, हा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेक यूजर्सनी शेअर केला आहे. वृत्तानुसार, शांघाय शहरात अनेक ठिकाणी बांधकाम सुरू असून जुन्या इमारतींचे स्थलांतर केले जात आहे. वॉकिंग मशीन आणि इतर उपकरणांच्या सहाय्याने, आतापर्यंत बांधलेली सर्वात अवजड इमारत देखील येथून तिकडे हलवण्यात आली.
सर्वप्रथम अचूक मोजमाप आणि आकडेमोड करण्यात आली. त्यानंतर इमारतीला त्या ठिकाणी ढकलण्यासाठी तळाशी सरकते रेलिंग बसवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रक्रियेच्या शेवटच्या टप्प्यात इमारत जमिनीवरून उचलली गेली आणि नंतर ‘वॉकिंग मशीन’ नावाच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ती पूर्णपणे हलवली गेली.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार याला स्ट्रक्चरल मूव्हिंग असे म्हणतात. इमारती उचलण्यासाठी किंवा किंचित हलविण्यासाठी हे तंत्रज्ञान यापूर्वीही वापरले गेले आहे. परंतु तब्बल ३८०० टन वजनाची आणि शंभर वर्षे जुनी इमारत पहिल्यांदाच हलविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, इमारतीचे कोणतेही नुकसान न होता तिचे स्थान बदलण्याची ही पहिलीच वेळ आहे. बघा या अफलातून तंत्रज्ञानाचा हा व्हिडिओ…
3,800-ton century-old building slowly "walking" in Shanghaipic.twitter.com/fCeTbKpR7M
— Zhang Meifang (@CGMeifangZhang) July 10, 2022
Amazing 3800 ton old building slowly walking video viral China Shanghai