अमळनेर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सुप्रसिद्ध शहनाईवादक संजय बाबुराव गुरव (वय ५५) यांचे आज अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मातोश्री सुमनबाई बाबुराव गुरव यांचे गेल्या महिन्यात १२ फेब्रुवारी रोजी अचानक हृदयविकाराने निधन झाले. त्याचा मोठा धक्का त्यांना बसला होता. तेव्हापासूनच त्यांची प्रकृती बिघडली. काही दिवसांपूर्वी त्यांना दवाखान्यात उपचारार्थ दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृतीत कुठलीही सुधारणा झाली नाही. अखेर आज दुपारी दीड वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ६ वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. गेल्या महिन्यात आई आणि त्यापाठोपाठ आता मुलाचे निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
संजय गुरव यांच्या शहनाईचे राज्यभरात असंख्य चाहते आहेत. त्यामुळेच धार्मिक, पारिवारीक किंवा अन्य स्वरुपाच्या कार्यक्रमांसाठी त्यांना मोठी मागणी होती. दत्त जयंतीला स्वामी समर्थ केंद्रामध्ये त्यांच्यावतीने दरवर्षी सादर केला जाणारा भक्तीगीतांचा कार्यक्रमही आकर्षणाचा विषय असतो. त्यांच्या पश्चात पत्नी, वडिल, मुलगा सुप्रसिद्ध गायक देवर्षी गुरव, मुलगी, दोन भाऊ, सून, नात असा मोठा परिवार आहे.
संजय गुरव यांच्या शहनाई वादनाचा बघा हा व्हिडिओ