विशेष प्रतिनिधी, मुंबई
आपल्या आजूबाजूला परसात, घराच्या अंगणात, टेरेसवर आपण छोटीशी बाग लावतो. या बागेत अनेक उपयुक्त झाडे, झुडपे, फुले, पाने, फळे असतात. यापैकीच एक म्हणजे कोरफड होय. कोरफडचे आयुर्वेदिक गुणधर्म सर्वांनाच माहित आहेत. कोरफडचा उपयोग खाण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी होतो. परंतु आता आणखी एक नवीन संशोधन समोर आले आहे.
इंदूरच्या आयआयटीमधील संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, कृत्रिम रसायनांऐवजी मेमरी चीप्स सारख्या डेटा स्टोरेज करण्यासाठी कोरफड फुलांच्या रसामध्ये आढळणारी नैसर्गिक रसायने वापरल्यास संशोधनात नवीन मार्ग निर्माण जाऊ शकतात. इंदूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) च्या संशोधकांनी असा दावा केला आहे की, कोरफड फुलांच्या रसात काही विशिष्ट रसायने देखील असतात, जे मेमरी चिप्स आणि इतर डेटा स्टोरेज उपकरणांच्या निर्मितीमध्ये उपयुक्त ठरू शकतात.
आयआयटी इंदूरचे भौतिकशास्त्र विभाग सहाय्यक प्राध्यापक डॉ. राजेश कुमार यांनी सांगितले की, आमच्या अभ्यासादरम्यान आम्ही कोरफड फुलांच्या रसातील उर्जा घेतली. या प्रयोगाच्या निकालांमधून असे दिसून आले की, त्याच्या रसात इलेक्ट्रॉनिक मेमरीच्या प्रभावांसह अन्य रसायने आहेत आणि त्यांची विद्युत चालता आवश्यकते नुसार वाढवू किंवा कमी केली जाऊ शकते. मेमरी चिप्स सारख्या डेटा स्टोरेजची साधने तयार करण्यासाठी कृत्रिम रसायने वापरली जातात, परंतु आता कृत्रिम रसायनांऐवजी कोरफड फुलांच्या रसात आढळणारी नैसर्गिक रसायने वापरल्यास नवीन सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात.