इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला चेंगराचेंगरीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. हैदराबाद येथे झालेल्या या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. चिक्कडपल्ली पोलिसांनी ही कारवाई केली.
पुष्पा २ रिलीज झाला तेव्हा प्रिमियरला अल्लू अर्जूनने हजेरी लावली होती. अल्लू येणार म्हणून त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली. यावेळी गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात मृत महिलेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
अल्लू अर्जुनाच पुष्पा अगोदर हिट झाला. त्यानंतर पुष्पा २ रिलीज झाला. याला मोठा प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाने सर्व रेकॅार्डही सुरुवातीच्या दिवसात तोडले.