गुरूवार, जुलै 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तिन्ही सैन्य दलांच्या ११ महिला सदस्यांनी सागरी मोहिमेत १८०० सागरी मैलांचा प्रवास इतक्या दिवसात केला पूर्ण…

by Gautam Sancheti
जून 5, 2025 | 8:31 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 10


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा)-
तिन्ही सैन्य दलांच्या केवळ महिला सदस्यांचा समावेश असलेला सागरी मोहिमेचा चमू ४ जून रोजी मायदेशी परतला. या चमूने सेशेल्सपर्यंतचा १८०० सागरी मैलांचा ऐतिहासिक आंतरराष्ट्रीय प्रवास पूर्ण केला. या ऐतिहासिक मोहिमेला ७ एप्रिल रोजी प्रारंभ झाला होता. भारतीय सशस्त्र दलातील केवळ महिला सदस्यांचा समावेश असलेल्या चमून केलेली ही आंतरराष्ट्रीय खुल्या समुद्रातील ही पहिली मोहीम ठरली आहे.

लष्करी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे कमांडंट, लेफ्टनंट जनरल ए. के. रमेश यांनी या मोहिमेला मुंबईत झालेल्या औपचारिक समारंभात झेंडा दाखवून रवाना केले होते. ही मोहीम लिंगभाव समावेशक कार्यान्वयनीन उत्कृष्टतेच्या वाटचातील एक मैलाचा दगड असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या मोहिमेत सहभागी झालेल्या चमूचे धैर्य आणि दृढनिश्चयाचेही त्यांनी कौतुक केले. सशस्त्र दलांच्या परिचालन क्षमतेत महत्वाचे योगदान देणाऱ्यांमध्ये महिलांची भूमिका वाढत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

त्रिवेणी (56 फुटांची पाल नौका – sailing yacht) या स्वदेशी बनावटीच्या भारताच्या सशस्त्र दलाच्या सेवेतील जहाजावरून लष्कर, नौदल आणि वायुसेनेतील ११ महिला अधिकाऱ्यांच्या चमूने जवळपास दोन महिने खुल्या समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करत ही मोहिम पूर्ण केली. समुद्री वाऱ्याच्या तीव्र झडपा, सातत्याने बिघडणारी सागरी स्थिती आणि दीर्घकाळ थकवा सहन करत, या चमूने विलक्षण सहनशक्ती आणि अतूट दृढनिश्चयाचे दर्शन घडवले. या चमूत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची नावे खाली दिली आहेत. :

भारतीय लष्कर : लेफ्टनंट कर्नल अनुजा, मेजर करमजीत, मेजर तान्या, कॅप्टन ओमिता, कॅप्टन दौली आणि कॅप्टन प्राजक्ता
भारतीय नौदल : लेफ्टनंट कमांडर प्रियांका
भारतीय वायुसेना : स्क्वाड्रन लीडर विभा, स्क्वाड्रन लीडर श्रद्धा, स्क्वाड्रन लीडर अरुवी आणि स्क्वाड्रन लीडर वैशाली
या मोहिमेदरम्यान सेशेल्समधल्या थांब्याच्या वेळी या चमूने उच्च-स्तरीय संरक्षण विषयक आणि राजनैतिक कार्यक्रमांमध्येही सहभाग नोंदवला. याअंतर्गत त्यांनी सेशेल्सचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, संयुक्त संरक्षण दलांचे प्रमुख आणि सेशेल्समधील भारताचे उच्चायुक्त यांच्याशी औपचारिक संवादही साधला. या कार्यक्रमांमुळे या चमूला आपली सागरी मुत्सद्देगिरी अधिक सक्षम करण्यात मदत झाली, तसेच हिंद महासागरातील बेट स्वरुपातील राष्ट्रांसोबत भारताची धोरणात्मक भागीदारीही अधिक विस्तारली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महाराष्ट्राच्या प्रगतीचा बहुआयामी आराखडा तयार; २०३० पर्यंत ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Next Post

दोघांकडे एकमेकांचा नंबर, फोन करावा….राज- उध्दव ठाकरे युतीबाबत अमित ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Next Post
amit

दोघांकडे एकमेकांचा नंबर, फोन करावा….राज- उध्दव ठाकरे युतीबाबत अमित ठाकरे यांचे मोठे वक्तव्य

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी पैशाचा अपव्यय काळजीपूर्वक टाळावा, जाणून घ्या, गुरुवार, ३१ जुलैचे राशिभविष्य

जुलै 30, 2025
bjp11

शरद पवार गटाला धक्का….या माजी मंत्रीने त्यांच्या दोन पुत्रांसह केला भाजपामध्ये प्रवेश

जुलै 30, 2025
CM

उद्योगांच्या सर्व परवानग्या आता मैत्री पोर्टलवर ऑनलाईन मिळणार….मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जुलै 30, 2025
Maha Gov logo 07 1 1024x512 1

राज्यातील ७० औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवीन अभ्यासक्रम होणार सुरू….

जुलै 30, 2025
trump 1

भारतावर २५ टक्के ट्ररिफ लावण्याची डोनाल्ड ट्रम्पची घोषणा…

जुलै 30, 2025
IMG 20250730 WA0238 1

येवल्यातील विस्थापित गाळे धारकांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात बैठक…

जुलै 30, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011