नाशिक – ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष कुलतरन सिंग अटवाल , वेस्ट झोन उपाध्यक्ष विजय कालरा, चेअरमन एस के मित्तल यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशात ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय घेण्यात आला आहे. मोटर मालक कोणत्याही प्रकारची हमाली वराई देणार नाहीत. ज्याचा माल तोच हमाली वराई देईल हमालीची प्रथा ही चुकीच्या पध्दतीने वाहन मालकांवर लादली गेली. त्यामुळे वाहन मालकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी होत आहे. वाहन मालकांची आर्थिक हानी थांबिण्यासाठी ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसने ज्याचा माल त्याचा हमाल हा निर्णय संपुर्ण देशात लागु केला आहे. महाराष्ट्र शासनाचे परिपत्रक २०१६ नुसार हमाली वराई ही ज्याचा माल असेल त्यांनीच द्यायची आहे. तरी पण व्यापारी, कंपनी हे वाहन मालकांकडून हमाली वसूल करतात असे करणे चुकीचे आहे. ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस कडून व्यापारी, कंपनी, कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळविण्यात येत आहे की हमाली वराई वाहन मालक देणार नाहीत. जर कोणीही जबरदस्तीने वाहन मालकांकडून हमाली मागितली तर ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस त्यांच्या विरोधात कारवाई करून पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करणार असल्याचे ट्रान्संपोर्ट काँग्रेसच्या पदाधिका-यांनी सांगितले.