नाशिक – देशात डिझेल दरवाढ विरोधात माल वाहतूकदारांकडून २८ जून रोजी काळा दिवस (ब्लॅक डे) पाळण्यात येणार आहे. सर्व वाहतूकदार काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करणार आहे. प्रत्येक जिल्हाधिकारीकडे सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात येणार आहे तरी सरकारला जाग नाही आली तर ऑगस्ट महिन्यात चक्काजामचा निर्णय घेण्याचा इशारा ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेस कडून सरकारला देण्यात आला आहे .
ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसची राष्ट्रीय बैठक संपन्न झाली बेठकीत संपूर्ण देशातील वाहतूकदार एकत्र होऊन २८ जून रोजी काळा दिवस म्हणून साजरा करणार आहे. डिझेल दरवाढ कमी करण्यात यावी रोड टॅक्स माफी मिळावी, हफ्ते स्थगिती सहा महिन्यांसाठी देण्यात यावी सरकारने वाहतूकदारांचा कोणताही विचार केला नाही. गेल्या एक वर्षापासून सतत डिझेल दरवाढ झाल्यामुळे वाहतूकदारांचे कंबरडे मोडले आहे. देशातील २ कोटी ट्रॅकर्सवर वाईट परिणाम झालेला आहेत
देशातील ८५ टके वाहतूकदारांनकडे एक ते दोन गाड्या असून ते छोटे व्यावसायिक आहेत. या वर्गाला अतिशय भंयकर परिस्थितीत व्यवसाय करावा लागत आहे. एक तर धंदा नाही व बँकेचे हफ्ते भरण्यासाठी पैसे नाहीत म्हणून अशा परिस्थितीत वाहतूकदारानंकडे फक्त आत्महत्या करण्याचा पर्याय उरला आहे म्हणून ऑल इंडिया मोटार ट्रान्संपोर्ट काँग्रेसने संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलनाचा निर्णय घेतला आहे