मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- आयटेल हा भारतातील आघाडीचा तंत्रज्ञान ब्रँड २०२५ मध्ये मोठी झेप घेत भारतातील बजेट स्मार्टफोन विभागाचे नेतृत्व करण्यास सज्ज आहे. ए८० स्मार्टफोन सब ७के सेगमेंटमध्ये अग्रस्थानी आहे, ज्यामध्ये १२० हर्टझ रिफ्रेश रेट आणि आयपी ५४ वॉटर रेसिस्टण्ट रेटिंग आहे, ज्यामधून सर्वोत्तम व्हिज्युअल्स, सुस्पष्ट डिस्प्ले क्वॉलिटी आणि अद्वितीय टिकाऊपणाची खात्री मिळते. हे पाऊल ब्रँडच्या ऑसम सिरीज लाइनअपमध्ये धोरणात्मक भर आहे.
आयटेल ए८० मध्ये डायनॅमिक बार असलेला विशाल ६.६७-इंच पंच होल डिस्प्ले आहे, जो सुलभ व विनासायास युजर इंटरफेस देतो. प्रगत प्रोसेसर, ८ जीबी रॅम (४ जीबी + ४ जीबी*) आणि १२८ जीबी रॉम असलेला हा डिवाईस मल्टीटास्किंग व व्यापक स्टोरेज देतो, तसेच जवळपास तीन वर्षांसाठी विना-व्यत्यय फ्लूइन्सी अनुभव देतो. अशी अविश्वसनीय वैशिष्ट्ये असलेला ए८० स्मार्टफोन फक्त ६९९९ रूपयांमध्ये उपलब्ध आहे.
आकर्षकरित्या लक्षवेधक डिझाइन असलेला आयटेल ए८० स्मार्टफोन प्रभावित करण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे. ए८० चा ५० मेगापिक्सल सुपर एचडीआर कॅमेरा अचंबित करणाऱ्या फोटोग्राफीसह सर्वांचे लक्ष वेधून घेईल. हा कॅमेरा अंधुक प्रकाशात देखील सुस्पष्ट फोटो व व्हिडिओ कॅप्चर करतो. यामध्ये रिंग लाइट नोटिफिकेशन देखील आहे, जे उत्तम वैशिष्ट्यांमध्ये अधिक भर आहे. ६.६७-इंच पंच-होल डिस्प्ले मनोरंजन व व्हिज्युअल कथानकाला अधिक आकर्षक करतो आणि डिवाईसचा डायनॅमिक बार स्टायलिश व त्यात आधुनिक आकर्षकतेची भर करतो. ही सर्वोत्तम वैशिष्ट्ये युजर अनुभव अधिक उत्साहित करतात, ज्यामुळे ए८० स्मार्टफोन वापरासाठी उत्साहवर्धक डिवाईस आहे.
ए८० धूळरोधक व जलरोधकसाठी आयपी५४ रेटिंगसह टिकाऊपणासाठी डिझाइन करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड १४ गो ओएस आणि युनिसॉक टी६०३ ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे, जे सर्व दैनंदिन टास्क्ससाठी सुलभ व कार्यक्षम परफॉर्मन्स देते. विश्वसनीयतेच्या अधिक खात्रीसाठी आयटेल खरेदीच्या १०० दिवसांमध्ये मोफत स्क्रिन रिप्लेसमेंट देते. हा स्मार्टफोन सँडस्टोन ब्लॅक, ग्लेशियर व्हाइट आणि वेव्ह ब्ल्यू या आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये व्यावहारिकतेसह आकर्षकतेचे उत्तम संयोजन आहे. आयटेल ए८० स्मार्टफोन आता भारतभरातील रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे, जो ग्राहकांकरिता त्यांच्या दैनंदिन डिजिटल अनुभवांना अधिक उत्साहित करण्यासाठी शक्तिशाली व स्टायलिश डिवाईस देतो.
आयटेल इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अरिजीत तालापात्रा म्हणाले, ”आम्ही वर्ष २०२५ मध्ये प्रवेश करत असताना अत्याधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन आणि अपवादात्मक वैशिष्ट्यांचे एकत्रिकरण असलेले इनोव्हेशन्स अद्वितीय किमतीमध्ये सादर करत ग्राहकांप्रती आमची स्थिर कटिबद्धता अधिक दृढ करत आहोत. लाँच करण्यात आलेला ए८० स्मार्टफोन त्या दिशेने पाऊल आहे आणि आजच्या तरूण भारतीयांसाठी तंत्रज्ञान तफावत दूर करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला अधिक दृढ करतो. आकर्षक १२० हर्ट्झ रिफ्रेशर रेट व अपवादात्मक टिकाऊपणासह ए८० स्मार्टफोन स्टाइलबाबत तडजोड न करता टिकाऊपण व युजर अनुभवासाठी वाढत्या मागणीची पूर्तता करण्याप्रती परिपूर्णपणे सज्ज आहे.”