हैदराबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने तेलंगाणा सरकारने धाडसी निर्णय घोषित केला आहे. येत्या १ सप्टेंबरपासून तेलंगाणा राज्यातील सर्व शाळा, अंगणवाडी केंद्र आणि सर्व शैक्षणिक संस्था सुरू केल्या जाणार आहेत. ती घोषणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी केली आहे. हे प्रत्यक्षात आल्याच गेल्या दीड वर्षात अशा प्रकारे सर्व शिक्षण संस्थाने सुरू होणारे तेलंगाणा हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. कोरोनाचा स्थितीचा आढावा सातत्याने घेतला जाणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून शैक्षणिक वाटचाल केली जाईल, असे राव यांनी घोषित केले आहे.
https://twitter.com/ANI/status/1429824411822026758