मंगळवार, जून 24, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘अलिबाबा’च्या संपत्तीला घरघर; वर्षभरात गमावली तब्बल ६.१६ अब्ज डॉलर संपत्ती

चीनचा 'हरवलेला' अब्जाधीश जॅक मा पुन्हा सापडला! गेल्या वर्षी होता आशियातील सर्वात श्रीमंत

by India Darpan
ऑक्टोबर 14, 2021 | 12:27 pm
in राष्ट्रीय
0
alibaba jack ma

नवी दिल्ली – गेल्या वर्षी अशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा चीनी अब्जाधीश व अलिबाबा ग्रुपचा संस्थापक जॅक मा हे अज्ञातवासात होते. बराच काळ चीन सरकारच्या कठोर कायद्याला सामोरे जाणारे जॅक मा परदेशात गायब झाल्याचे सांगण्यात येत होते, परंतु आता पुन्हा एकदा ते उद्योगात सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.

जॅक मा हाँगकाँगमध्ये बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा सार्वजनिक स्वरूपात दिसले. जॅक मा यांनी गेल्या आठवड्यात हाँगकाँगमध्ये रात्रीच्या जेवणाच्या वेळी काही व्यावसायिक सहकाऱ्यांची भेट घेतली. या काळात व्यावसायिक चर्चा देखील झाल्या. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून ई-कॉमर्स कंपनी अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा हे सार्वजनिक ठिकाणी दिसत नव्हते. या वर्षी जानेवारी महिन्यात एका धर्मादाय कार्यक्रमात ते व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले गेले. त्यानंतर आतापर्यंत ते सार्वजनिक ठिकाणी कुणालाच दिसले नाहीत. त्यामुळे तर्कवितर्क लढविले जात होते.

सुमारे दीड वर्षांपूर्वी जॅक मा हे आशियाचे सर्वात श्रीमंत अब्जाधीश होते. त्यांना चीन सरकारच्या कडक धोरणाचा सामना करावा लागत आहे. गेल्या वर्षाच्या शेवटी जॅक मा यांनी चीन सरकारवर टीका केली होती, तेव्हापासून त्यांच्या समूह कंपन्यांवर नियामक कारवाई सुरू झाली आहे. यानंतर, नोव्हेंबर 2020 मध्ये, चिनी अधिकाऱ्यांनी जॅक माच्या मुंगी समूहाचा 37 अब्ज डॉलरचा IPO स्थगित केला.

दरम्यान, ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्स नुसार, जॅक मा यांची संपत्ती 44.4 अब्ज डॉलर असून ते जगातील 31 वे सर्वात श्रीमंत अब्जाधीश आहेत. जॅक मा यांनी एका वर्षात तब्बल 6.16 डॉलर अब्ज संपत्ती गमावली आहे. जॅक मा भारताच्या अझीम प्रेमजी यांच्यापेक्षा फक्त दोन पावले मागे आहेत. आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांच्याकडील संपत्तीची किंमत 38.1 डॉलर अब्ज आहे. परंतु गेल्या वर्षीच्या सुरुवातीच्या महिन्यात जॅक मा हे आशियातील सर्वात श्रीमंत होते. कोरोनाच्या काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी जॅक मा यांना रँकिंगमध्ये मागे टाकले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

दसरा-दिवाळीसाठी पंजाब नॅशनल बँकेकडून जबरदस्त ऑफर्स; नक्की विचार करा

Next Post

आज आहे दसरा (विजयादशमी); असा आहे शुभमुहूर्त

India Darpan

Next Post
dasra vijayadashmi

आज आहे दसरा (विजयादशमी); असा आहे शुभमुहूर्त

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

goldBYQF e1743933825463

मुंबईत तस्करीचे सोने वितळवणारा अवैध गोल्ड मेल्टिंग कारखान्याचा पर्दाफाश…सात जण ताब्यात, ९ कोटीचे सोने जप्त

जून 24, 2025
Screenshot 20250623 224646 Collage Maker GridArt

धक्कादायक…मुलीला नीट परिक्षेत कमी मार्क पडल्याच्या रागातून मुख्याध्यापक बापाने केलेल्या बेदम मारहाणीत मुलीचा मृत्यू

जून 24, 2025
Corruption Bribe Lach ACB

पाच हजाराची लाच घेतांना ग्रामसेवकसह रोजगार सेवक एसीबीच्या जाळ्यात

जून 24, 2025
Shelar1

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही… मंत्री ॲड. आशिष शेलार

जून 24, 2025
भुसावळच्या सानवी सोनवणेनं आंतरराष्ट्रीय स्केटिंग2 1023x1536 1 e1750728227396

भुसावळच्या सानवी सोनवणेने आंतरराष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत पटकावले दोन सुवर्ण व तीन रौप्य पदक

जून 24, 2025
cm tribhasha meeting 875x420 1

त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 24, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011