इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आलिया – रणबीरची जोडी ही बॉलीवूडमधील लोकप्रिय जोडी. नुकताच आलियाने एक परीला जन्म दिला. तिच्या कौतुकातून कपूर आणि भट्ट कुटुंबियांना उसंत मिळत नाहीये. आता या छोट्या परीचे बारसेही झाले आहे. आलियाने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत आपल्या लेकीचे नाव सांगितले आहे, एवढेच नाही तर त्याचा अर्थ देखील तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
काही दिवसांपूर्वीच आलिया भट्ट व रणबीर कपूरच्या घरी चिमुकलीचं आगमन झालं. हे सेलिब्रिटी कपल आपल्या लेकीचं नाव काय ठेवणार याचीच सगळ्यांना उत्सुकता होती. आता आलियाने इन्स्टा स्टोरी खास पोस्ट शेअर करत आपल्या लेकीचं नाव सांगितलं आहे. आपल्या लेकीच्या नावाचा अर्थही तिने सांगितला आहे.
आलिया – रणबीरच्या लेकीच्या नावाबाबत कपूर कुटुंबीयांमध्ये खूप चर्चा झाली. आलियाने रणबीर आणि लेकीसह फोटो पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे. आलिया – रणबीर व त्यांच्या लेकीचा फोटो अगदी ब्लर आहे. लाल आणि निळ्या रंगाच्या जर्सीवर आलियाच्या लेकीचं नाव लिहिलेलं दिसतं. या सेलिब्रिटी कपलने आपल्या लेकीचं नाव ‘राहा’ असं ठेवलं आहे. विशेष म्हणजे तिचे हे नाव तिच्या आजीने म्हणजेच नीतू कपूर यांनी सुचवलं आहे.
“राहा या नावाला फारच चांगला अर्थ आहे. राहाचा अर्थ होतो दैवी मार्ग. स्वाहिलीमध्ये आनंद, संस्कृतमध्ये कुळ, बांगलामध्ये विश्रांती, आराम आणि अरेबिकमध्ये आनंद, स्वातंत्र्य असा राहा या नावाचा अर्थ होतो.” आपल्या या लेकीच्या आगमनाने आम्ही फारच आनंदात आहोत, असं आलिया सांगते. आमचं आयुष्य आताच सुरू झालं आहे असं वाटतंय, असंही आलियाने या पोस्टद्वारे म्हटलं आहे.
Alia Bhat Ranbir Kapoor Nitu Kapoor Daughter Name