इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – बॉलिवूडची सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्या घरी नव्या पाहुणीचे आगमन झाले आहे. रणबीर- आलिया आई-वडील झाले आहेत. आलियाने एका मुलीला जन्म दिला आहे. रणबीर आणि आलिया आई-वडील झाल्यावर संपूर्ण कपूर आणि भट्ट कुटुंब आनंदी आहे. आलियाची डिलिव्हरी नॉर्मल सर्जरी असली तरी याबाबत फारशी माहिती देण्यात आलेली नाही.
आलिया आणि रणबीरसाठी हे वर्ष खूप खास होते. या वर्षी एप्रिलमध्ये दोघांनी लग्न केले. जूनमध्ये आलियाने तिच्या गर्भधारणेची घोषणा केली आणि त्यानंतर आता दोघेही पालक झाले आहेत. या जोडप्याचे चाहते सोशल मीडियावर खूप खुश असून लक्ष्मी घरी आल्याचे सांगत आहेत. मुलीची पहिली झलक पाहण्यासाठी चाहते आतूर झाले आहेत.
बाळाच्या जन्मानंतर आलियाला बाळासोबत बराच वेळ घालवायचा असल्याने कामातून ब्रेक घेणार असल्याचे बोलले जात होते. बाळाच्या जन्मानंतर आलियाने लवकरच कामावर परतावे अशी रणबीरची इच्छा असल्याचे त्याने स्वत: एका मुलाखतीदरम्यान सांगितले आहे. असे असले तरी आलियाच्या चाहत्यांनी जास्त वाट पाहू नये, असे रणबीरला वाटते.
आलिया लवकरच रॉकी आणि राणीची प्रेमकथा या चित्रपटात दिसणार आहे ज्यात तिच्यासोबत रणबीर सिंग मुख्य भूमिकेत आहे. करण जोहर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. याशिवाय आलिया जी ले जरा या चित्रपटात दिसणार असून यामध्ये तिच्यासोबत कतरिना कैफ आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.
रणबीरबद्दल बोलायचे झाले तर तो अॅनिमल या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो लव रंजनच्या चित्रपटातही दिसणार असून यात श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत असणार आहे.
Alia Bhatt and Ranbir Kapoor Good News Delivery