नागपूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) एक अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यानुसार जगातील केवळ तीन टक्के लोक योग्य प्रमाणात मीठाचे सेवन करतात. भारतातही हे प्रमाण चिंताजनक असेच आहे.
मीठ, साखर योग्य प्रमाणात खायला हवे. या दोन्ही घटकांचा अतिरेक मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजीवन आजारांना निमंत्रण देतात. या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओचा अहवाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या अहवालाप्रमाणे सध्या जगातील प्रति व्यक्ती मिठाचा वापर १०.८ ग्रॅमइतका आहे.
मिठाच्या सेवनाचे हे प्रमाण निर्धारित प्रमाणापेक्षा तीन टक्क्यांनी अधिक आहे. वय वर्षे अठराहून अधिक असलेल्या व्यक्तींनी ५ ग्रॅमपेक्षाही कमी प्रमाणात मीठाचे सेवन करायला हवे. तर लहान मुलांनी यापेक्षाही कमी सेवन करायला हवे. मिठाचा वापर कमी केलास २०२५ पर्यंत २२ लाख लोकांचा जीव वाचू शकतो आणि २०३० पर्यंत जवळपास ७० लाख लोकांचा जीव वाचवला जाऊ शकतो.
असा मिळणार स्कोर
मिठाचे प्रमाण कमी करण्यासंदर्भातील पॉलिसीच्या आधारे या अहवालात स्कोर देण्यात आला आहे. हा स्कोर १ ते ४ दरम्यान आहे. १ मध्ये असे देश आहे ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात वचनबद्धता दर्शवली आहे. २ स्कोरवर ज्यांनी मिठाचा वापर कमी करण्यासंदर्भात पावले तर उचलली पण ती ऐच्छिक आहेत, बंधनकारक नाहीत. ३ स्कोर अशा देशांचा आहे, ज्या देशांनी आवश्यक नियम बनवून अन्नातील मीठाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच ४ स्कोर अशा देशांचा आहे, ज्यांनी मिठाचे प्रमाण रेग्युलेट करण्यासाठी पॅकेज्ड फूडमध्ये सोडियमचे प्रमाण दर्शवले.
समोरील बाजूस असावा इशारा
डब्ल्यूएचओनुसार, भारतात पाकीट बंद अन्नावर मिठाचे प्रमाण लिहिलेले असते. मात्र, पाकिटाच्या समोरील बाजूला अधिक मिठाचा इशारा देण्याची प्रॅक्टीस अद्याप सुरू झालेली नाही.
Alert WHO Report Salt Health Food intake