इंडिया दर्पण ऑनलाई डेस्क – व्हीएलसी हा अतिशय लोकप्रिय मीडिया प्लेयर आहे. याचे कारण असे आहे की ते आपल्या कॉम्प्युटरमध्ये कमीत कमी जागा घेते, शिवाय काही क्षणातच ते कॉम्प्युटरमध्ये लोड होते आणि जवळजवळ प्रत्येक व्हिडिओ फॉरमॅटमध्ये काम करतं. या सर्व गोष्टींमुळे युझर्सची व्हीएलसी मीडिया प्लेयरला सर्वाधिक पसंती मिळते. पण आता एक नवीन अहवाल समोर आला असून, त्या अहवालानुसार व्हीएलसी मीडिया प्लेयर युझर्सवर मालवेअर हल्ले करत आहे.
सिमेंटेकमधील सायबरसुरक्षा संशोधकांच्या अहवालानुसार, Cicada किंवा APT10 नावाची एक स्टेट स्पॉन्सर्ड चीनी समूह, युरोप, आशिया, उत्तर अमेरिकेसह जगभरातील देशांमधील सरकारी, कायदेशीर, धार्मिक, दूरसंचार, औषधी आणि गैर-सरकारी संस्थांमध्ये गुप्तहेरीसाठी मालवेअर लाँच करण्यासाठी Windows PC वर व्हीएलसी मीडिया प्लेयर वापरत आहे. सिकाडा सायबर हल्ल्यांचे बळी अमेरिका, कॅनडा, हाँगकाँग, तुर्की, इस्रायल, भारत, मॉन्टेनेग्रो, इटली आणि जपानमध्ये पसरलेले आहेत. अहवालानुसार, हल्लेखोर व्हीएलसी एक्सपोर्ट्स फंक्शनद्वारे कस्टम लोडर लॉन्च करून व्हीएलसी मीडिया प्लेयर वापरतात. सोप्या भाषेत सांगायचे तर ते कायदेशीर सॉफ्टवेअरवर मालवेयर टाकतात. ते नंतर पीडितांच्या मशीनवर दूरुन नियंत्रण ठेवण्यासाठी WinVNC साधन वापरतात.
नियंत्रण मिळाल्यानंतर हॅकर्स हे करतात..
एकदा हल्लेखोरांनी एका व्यक्तीच्या मशिनमध्ये प्रवेश मिळवला की, ते अनेक मालवेयर टाकून कॉम्प्युटरची एक्सिस मिळवतात. कॉम्प्युटरमध्ये असलेल्या सगळ्या फाइल्स, महत्त्वाची कागदपत्र या सगळ्याची माहिती ते मिळवू शकतात. त्यामुळे सामान्यांना धोका पोहोचतो. हा सिकाडा हल्ला २०२१च्या मध्यात सुरू झाला, सर्वात अलीकडे फेब्रुवारी २०२२मध्येदेखील त्याविषयी प्रकरणे दिसून आली. ज्यामध्ये हॅकर्सने लोकांच्या कॉम्प्युटर नेटवर्कमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी मायक्रोसॉफ्ट एक्सचेंज सर्व्हरमध्ये प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला. गुप्तहेरी करणं हे यामागचं मूळ कारण असल्याचं संशोधकांकडून सांगण्यात येत आहे.