मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे वृत्त आहे. कारण, पुढील पाच दिवस महाराष्ट्रात तीव्र हवामानाचे राहणार आहेत. तसा गंभीर इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गडगडाटासह पाऊस होणार असल्याचे विभागाने सांगितले आहे. विभागाने जिल्हानिहाय दिलेला इशारा खालीलप्रमाणे
७ जून – नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.
८ जून – नाशिक, नगर, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, औरंगाबाद, पालघर, परभणी, या जिल्ह्यांमध्ये वीजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा आहे.
९ जून – निम्म्याहून अधिक राज्यामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामानशास्त्राच्यावतीने दिल्या जाणाऱ्या माहिती आणि इशाऱ्यांकडे लक्ष ठेवावे, असेही विभागाने सांगितले आहे.
https://twitter.com/RMC_Mumbai/status/1533747336119488513?s=20&t=yPkW2a6vb7w8ExS4K1fKOg