माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ
मॅन-दौंस चक्रीवादळ आज विरळले असून केरळ-कर्नाटक सीमेवरील किनारपट्टीवर परवा (१३ ला) पुन्हा अरबी समुद्रात उतरून कमी दाब क्षेत्रात रूपांतरित होऊन अरबी समुद्रातच पश्चिकडे सरकून येमेन व ओमान देशांच्या आग्नेय किनारपट्टीकडे निघून जाईल. चक्रीवादळाच्या वातावरणातून आज व उद्या महाराष्ट्रात मध्यम पावसाची शक्यता असली तरी वातावरणाची विशेष तीव्रता कदाचित आजच्या पुरतीही मर्यादित राहू शकते. उद्या कदाचित मध्यम पावसाचा जोर काहीसाच कमीही जाणवू शकतो. उद्या खान्देश नाशिक नगर पुणे औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणीच पावसाबरोबर व्यापक क्षेत्रावर केवळ आकाश झाकळलेलेच जाणवेल असे वाटते.
गुरुवार दि.१५ ते सोमवार दि.१९ पर्यन्त किमान तापमानात काहीशी वाढ होऊन महाराष्ट्रात थंडी गायब होण्याची शक्यता जाणवते.
त्यानंतरही उद्या दक्षिण अंदमानात शक्यतेत असलेले चक्रीय वारे व त्यातून तयार होणाऱ्या कमी दाबाच्या क्षेत्राचें स्वरूप व त्याची मार्गस्थ वळण दिशा ह्यावरच यापुढील नाताळातील थंडीचे स्वरूप अवलंबून असेल. बघू या काय घडते? बदलानुसार माहिती तशी दिली जाईलच. परंतु महाराष्ट्रावरील त्याचा काहीसा परिणाम कमीच जाणवेल असे वाटते. तेंव्हा पुन्हा २१ डिसेंबर नंतर महाराष्ट्रात थंडीची अपेक्षा करू या!
Alert Rainfall Climate Forecast Weather