पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पेट्रोल पंप बंद राहणार म्हटल्यावर लोकांचे जेवढे हाल होतात, तेवढेच आता सीएनजी बंद राहणार म्हटल्यावर उडतो. कारण सीएनजीच्या भरवशावर टॅक्सी आणि ऑटोरिक्षा चालतात. अशात सीएनजी उपलब्ध नसणार म्हटल्यावर सर्वांचे हाल होणार हे निश्चित असते. अशीच परिस्थिती महाराष्ट्रातील एका शहरात निर्माण होणार आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक वर्दळीचे दुसऱ्या क्रमांकाचे शहर असलेल्या पुण्यात ही परिस्थिती निर्माण होणार आहे. कारण संपूर्ण पुणे जिल्ह्यात १० ऑगस्टपासून सीएनजीची विक्री बेमुदत काळापर्यंत बंद होणार आहे. पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना टोरेंट कंपनीकडून गॅस पुरविला जातो. या कंपनीकडे कमिशनच्या सुधारित दराची ४२ पंपचालकांकडे १६ महिन्यांची एकूण ९ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कमिशनमधील वादाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे पुणे सीएनजींचे ४२ पंप १० ऑगस्टपासून बेमुदत बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशन ऑफ पुणे यांच्याकडून याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या परिस्थितीत वाहन चालकांना आत्ताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहेत.
बैठका झाल्या पण…
याबाबत तत्कालीन अन्य व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेत पुण्यात दोन बैठका झाल्या. परंतु त्यात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पंपचालक सीएनजी विक्री १० ऑगस्टपासून बंद ठेवणार असल्याचे संघटनेच्या अध्यक्षांनी जाहीर केले आहे.
Alert Pune CNG Pump Closed Strike
fuel compressed natural gas petrol August