नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधनाच्या किमती वाढत असताना देशातले करही वाढून पुन्हा इंधन दरवाढीचा दुहेरी फटका सर्व ग्राहकांना बसतो आहे. आता देशात आणखी पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याला रशियाचे धोरण कारणीभूत ठरू शकते, असे म्हटले जात आहे.
रशिया-युक्रेन युद्ध भडकल्यापासून भारत रशियाचा सर्वात मोठा तेल आयातदार बनला आहे. रशियाच्या या धोरणामुळे देशातंर्गत इंधन वाढीची शक्यता आहे. डिझेलची समस्या उभी राहिली तर दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. अमेरिकेत डिझेलच्या किमती वाढल्यामुळे तेथील अर्थव्यवस्थेवर १०० अब्ज डॉलर्सचा आर्थिक बोजा वाढण्याचा अंदाज आहे. अमेरिकेतील डिझेल आणि हीटिंग ऑइलचे साठे चार दशकांच्या नीचांकी पातळीवर आले आहेत. युरोपमध्ये देखील सध्या डिझेलच्या स्टॉकची कमतरता आहे.
गेल्या काही महिन्यांपासून युक्रेन आणि रशियामध्ये युद्ध अद्याप सुरूच आहे. त्यामुळे जगभरातील अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे रशियाकडून डिझेलचा पूरवठा कमी करण्यात आलाय. यामुळे मार्च २०२३ मध्ये डिझेलचे संकट आणखी गडद होऊ शकते. जागतिक निर्यात बाजारात डिझेलचे इतके संकट आहे की पाकिस्तानसारख्या गरीब देशांना देशांतर्गत गरजांसाठी देखील डिझेल मिळत नाही.
बेंचमार्क असलेल्या न्यूयॉर्क हार्बरच्या स्पॉट मार्केटमध्ये या वर्षी डिझेलच्या किमती ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे
जगभरातील इंधन शुद्धीकरण क्षमतेत घट झाली आहे. कच्च्या तेलाच्या पुरवठ्या बाबतही समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोना महामारीच्या काळात मागणी कमी झाल्यानंतर रिफायनिंग कंपन्यांनी त्यांचे कमी नफा देणारे अनेक प्लांट बंद केले. या वर्षी मार्चपासून भारताला या स्वस्त इंधनाचा पुरवठा सुरु आहे. पण आता ही सुविधा फार काळ सुरु राहणार नसल्याचे संकेत आहेत. रशिया कच्च्या तेलावर कॅपिंग करण्याचा म्हणजे एक निश्चित दर आकारण्याचा विचार करत आहे. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे.
तसेच रशियाने वेगळा निर्णय घेतल्यास, कच्च्या तेलाच्या किंमती भडकतील. भारतीय तेल उत्पादक कंपन्यांना महाग दराने इंधन खरेदी करावे लागेल. त्यामुळे देशातंर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. सन२०२० पासून यूएस शुद्धीकरण क्षमता प्रतिदिन एक दशलक्ष बॅरलने कमी झाली आहे. तर युरोपमध्ये कामगारांच्या संपामुळे रिफायनिंगवर परिणाम झाला आहे.
विशेष म्हणजे रशियाकडून पुरवठा बंद झाल्यानंतर अडचणी आणखी वाढणार आहेत. युरोपीय देश डिझेलवर सर्वाधिक अवलंबून आहेत. फेब्रुवारीमध्ये, युरोपियन युनियनच्या सागरी मार्गांनी रशियाला वितरणावर बंदी लागू होईल. मात्र रशियातून येणाऱ्या पुरवठ्याला पर्याय न मिळाल्यास युरोपीय अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो.
सध्या रशियाला तेल उत्पादनात मोठा खर्च करावा लागत आहे. तर कच्च्या तेलाची विक्री स्वस्तात करावी लागत आहे. हा खर्च भरुन काढण्यासाठी रशिया तेलावर उच्च किंमत मर्यादा घालून देण्याच्या विचारात आहे. मात्र आता रशिया भारतासह चीनला स्वस्तात, सवलतीत कच्च्या तेलाचा पुरवठा करत आहे. परंतु हा निर्णय किती दिवस राहणार हे अनिश्चित असल्याने इंधनाचे दर निश्चितच वाढण्याची शक्यता आहे, असे म्हटले जाते.
Alert Petrol Diesel Prices Hike Soon now this is Reason
Russia Crude Oil Fuel