पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आजकाल बाजारात विकल्या जाणार्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ केली जात आहे. दूध, दही, तूप, डाळी अशा अनेक खाद्यपदार्थांमध्ये भेसळ होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येतात. दुसरीकडे, आजकाल बाजारात विकल्या जाणार्या पनीर आणि चीजमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे तुम्हाला माहिती आहे का.
अलिकडच्या काळात बहुतेक घरांमध्ये पनीरची भाजी बनवली जाते. अशा परिस्थितीत बाजारात विकले जाणारे भेसळयुक्त पनीर खाल्ल्यानंतर तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. जर तुम्हीही पनीर बाजारातून विकत घेतल्यानंतर खात असाल तर अशा परिस्थितीत, आपण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
खरे आणि बनावट पनीर नक्की कसे ओळखायचे असा प्रश्न आपल्याला पडला असेल. घरच्या घरी आपण ते ओळखू शकतो. त्याविषयी आता आपण जाणून घेऊ…
तुमच्या हाताने पनीर चुरगळून करून तुम्ही खरे आणि नकली पनीर ओळखू शकता. चुरगळल्यानंतर पनीर खाली पडायला लागले तर ते पनीर बनावट आहे हे समजून घ्या.
नकली पनीर पाण्यात उकळूनही ओळखू शकता. यासाठी पनीर पाण्यात उकळण्यासाठी ठेवावे लागेल. यानंतर, पनीर पाण्यातून काढून टाका आणि थंड होऊ द्या. ते थंड झाल्यावर, तुम्हाला पनीरवर सोयाबीन किंवा मटार पावडर घालावी लागेल. अशा स्थितीत पनीर १० ठेवा. असे केल्यावर जर पनीरचा रंग हलका लाल झाला. तर यातून स्पष्ट होके की हे पनीर डिटर्जंट किंवा युरियापासून बनवले गेलेले असेल.
खरे पनीर त्याच्या वासावरून देखील ओळखू शकता. खऱ्या पनीरला दुधासारखा वास येतो. हे तुम्हाला माहीत असेलच. त्याच वेळी, बनावट पनीरला कुठलाही वास नसतो.
https://twitter.com/mp_husbandry/status/1641779363510198273?s=20
Alert Paneer Adulteration How to check Original