ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामारीमुळे आता बहुतांश जण ऑनलाईन किंवा डिजिटल पेमेंटला प्राधान्य देत आहे. सर्व क्षेत्रात बरे वाईट परिणाम जाणवत आहेत. आता डिजिटल पेमेंटमध्ये वाढ होऊन अधिकृत आकडेवारीनुसार, डेबिट-क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग आणि युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) यांसारख्या माध्यमांद्वारे डिजिटल पेमेंटमध्येही मोठी वाढ झाली आहे. वास्तविक, कोविड-19 महामारीच्या काळात नागरिकांना सावधगिरी म्हणून आधुनिक काळात वेगवेगळे तंत्रज्ञान उपलब्ध झाले असून मोबाईल आणि संगणकाच्या माध्यमातून अनेक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या तरी त्यामुळे मोठ्या प्रमाणात फसवणूक देखील होत असल्याचे दिसून येते. विशिष्ट सायबर क्राईम गुन्हेगारी वाढली असून यामध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.
आपण देखील बिनदिक्कतपणे QR कोड स्कॅन करून पेमेंट करत असाल, तर सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे, कारण तुम्ही कधीही हॅकर्सचे लक्ष्य होऊ शकता. तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, फसवणूक करणारे भामटे हे सर्व सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्ती म्हणून आता बनावट QR कोड वापरत आहेत. कोरोना साथीच्या रोगापासून हे कोड वापरणे अधिक सर्वमान्य झाले आहेत, तसेच QR कोड असलेले फिशिंग ईमेल अनेकांकडे येत आहेत, परंतु भामटे तथा गुंडांनी या साध्या भोळ्या नागरिकांच्या कष्टाच्या पैशातून फसवणूक करण्याची स्वतःची संधी म्हणून पाहिले आहे. या भामट्यांची नवीन युक्ती म्हणून बनावट QR कोड असलेले फिशिंग ईमेल बनत आहे. याद्वारे, ते तुमच्या बँक खात्याचे तपशील आणि वैयक्तिक तपशील मिळविण्यासाठी तयार केलेल्या बनावट वेबसाइटवर पाठवू शकतो.
सीएनईटीने आपल्या अहवालात म्हटले आहे की, वाढती समस्या असून अनेक नागरिक या सापळ्यात सापडतात, कारण त्यांना अशा फसव्या लिंक दिसत नाहीत ज्यावर बनावट QR कोड पाठवू शकतो. त्यामुळे सुरक्षा तज्ज्ञांना त्यांचा मागोवा ठेवणेही अवघड जाते. तसेच जेव्हाही नवीन तंत्रज्ञान समोर येते, तेव्हा सायबर गुन्हेगार त्याचा फायदा घेण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतात. तज्ज्ञांचा इशारा दिला आहे की, या धोक्यामुळे क्यूआर कोड स्कॅन करताना सर्व नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सार्वजनिक ठिकाणी पाहिल्यास हे कोड अधिकृत पोस्टरसारखे दिसत आहे की नाही याचा विचार करावा, तसेच जर भामटे ते तुम्हाला बँक खात्याचे तपशील देण्यास सांगत असेल, तर तसे चूकूनही करू नका. ईमेलद्वारे क्यूआर कोड प्राप्त करणे थोडे अवघड आहे, त्यामुळे ही आणखी एक धोक्याची घंटा समजावी, असेही तज्ज्ञ म्हणतात.